agriculture news in Marathi farmers agitation for oppose to farm laws Maharashtra | Agrowon

कृषी कायद्यांविरोधात राज्यात शेतकऱ्यांचा एल्गार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविध संस्था, संघटनांनी गुरुवारी (ता.३) आंदोलन केले.

पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविध संस्था, संघटनांनी गुरुवारी (ता.३) आंदोलन केले. या वेळी शेतकरी विरोधी कायदे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे, रास्ता रोको, शेतीमाल फेको, आत्मक्लेष आंदोलने करण्यात आली. 

सांगलीमध्ये सर्व पक्षीय कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार (ता ३) निदर्शने केली. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमेर आंदोलकांनी निदर्शने केली. दिल्ली येथील आंदोलकांशी चर्चा करण्याऐवजी वेळकाढू भूमिका घेणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, उमेश देशमुख, मुनीर मुल्ला, डॉ. बाबूराव गुरव, ज्योती आदाटे, अभिजित हारगे, अमोल पाटील, शशिकांत गायकवाड, डॉ. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आली. सर्व पक्षीय कृती समितीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले.

साताऱ्यात संयुक्त किसान संघर्ष समन्वयच्या वतीने गुरुवारी (ता.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कामगार शेतकरी संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान सभा, बळिराजा शेतकरी संघटना, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यवतमाळ मध्ये शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. 

नांदेडमध्ये जागरण भजन आंदोलन
नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय जागर भजन आंदोलन करण्यात आले. गुरुवारी (ता. ३) सायंकाळी सात ते रात्री बारा या दरम्यान जागरण, भजन आंदोलन करण्यात आले, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी दिली. 

झाडावर आत्मक्लेष आंदोलन 
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुलडाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संग्रामपूर तालुक्यातील बोडखा शिवारात झाडावर चढून आत्मक्लेष आंदोलन केले. विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.

सुकाणू समितीतर्फे चक्काजाम 
परभणीत गुरुवारी (ता.३) परभणी- गंगाखेड राज्य मार्गावरील पोखर्णी फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या मुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. 

‘छात्रभारती’चे आंदोलन 
संगमनेर मध्ये छात्रभारती संघटनेने पाठिंबा दिला. बुधवारी (ता.२) संगमनेर येथील बसस्थानकासमोर त्यासाठी आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

  • शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करावेत
  • दिल्लीतील शेतकरी आंदोलकांशी केंद्र शासनाने तातडीने चर्चा करावी
  • शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम द्या
  • शेतकऱ्यांवर दडपशाही करू नका
  •   हमीभावाच्या कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी
  • शेतमालाच्या किमती हमीभावापेक्षा कमी होणार नाहीत यासाठी उपाययोजना कराव्यात

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...
खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना...पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी...
गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसानसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता....
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
अजून एक ‘बारामती पॅटर्न’कार्यालय आम्हाला घरच्यासारखे वागवते, कर्मचारी...