agriculture news in Marathi farmers agitation over onion export ban Maharashtra | Agrowon

कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही आंदोलने

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याच्या विरोधात बुधवारी औरंगाबाद, परभणीसह ठिकठिकाणी शेतकरी, राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याच्या विरोधात बुधवारी (ता.१६) औरंगाबाद, परभणीसह ठिकठिकाणी शेतकरी, राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील जुने कायगाव (ता. गंगापूर)  येथे शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. या वेळी निर्यात उठवावी, कांद्याला आणि इतर शेतीमालाला योग्य भाव द्यावा, आदी मागण्यांबाबत गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांना निवेदन दिले. आंदोलनात प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब शेळके, लक्ष्मण मंडवगड, संतोष गायकवाड, राहुल चव्हाण, सुबूर शेख, रामदास वाघ, गणेश खैरे, सुनील धाडगे आदींसह शेतकरी हजर होते.पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री तथा कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, शहर जिल्हा अध्यक्ष नदिम इनामदार, तालुका अध्यक्ष पंजाब देशमुख, रामभाऊ घाडगे, संजय लोलगे, हेमंत आडळकर, बाळकाका चौधरी, गुलाब सिरसकर, तुकाराम साठे आदी उपस्थित होते. 

परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव आरमळ,डिंगाबर पवार, मुंजाभाऊ लोडे,भास्कर खटींग, शेख जाफर, आदि सहभागी झाले होते.
 


इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...