पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने 

केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक विधेयकांविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये संताप वाढीस लागला आहे. तसेच अनेक पक्षांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत विरोध केला.
farmers agitation
farmers agitation

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक विधेयकांविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये संताप वाढीस लागला आहे. तसेच अनेक पक्षांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत विरोध केला. पंजाब आणि हरियानात ठिकठिकाणी शेतकरी या विधेयकांविरोधात आंदोलने करत आहेत. 

दरम्यान, शिरोमणी अकाली दलच्या हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. कॉंग्रेसनेही या विधेयकांना विरोध केला आहे. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनीही कृषी विधेयकांना विरोध असल्याचे ट्वीट करून सांगितले. तर, किसान मजदूर संघर्ष समितीने २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान आंदोलनाची हाक दिली आहे. 

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या घरासमोर बादल गावातील शेतकरी गेल्या १५ सप्टेंबरपासून आंदोलन करत आहेत. शुक्रवारी (ता.१८) सकाळी बादल गावातील एका ६० वर्षीय शेतकऱ्याने माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या घरासमोरच विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत शेतकऱ्याला बादल गावातील एका रुग्णालयात दाखल केले. विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com