शेतकरी संप : पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली

शेतकरी संप : पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली
शेतकरी संप : पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली

पुणे : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यासह देशाच्या विविध भागांत सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील भाजीपाल्याची आवक २५ टक्के घटल्याने दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली हाेती. भाजीपाल्याच्या सरासरी आवकेच्या तुलनेत सुमारे ५० ट्रक भाजीपाल्याची आवक कमी झाली हाेती. यामध्ये स्थानिक आवक कमी झाली हाेती.  राज्याच्या विविध भागातील शेतकरी संपामुळे वाहनचालकांनी वाहनांच्या नुकसानीच्या भीतीने शेतीमाल आणला नसल्याने आवक मंदावली हाेती. परिणामी बहुतांश भाजीपाल्याच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली हाेती. संप आणखी किती दिवस चालेल याची शाश्‍वती नसल्याने किरकाेळ खरेदीदारांकडून भाजीपाल्याची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली असल्याची ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले. तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटितपणे भाजीपाल्याची वाहने एकत्रित पाठवल्याने आवक झाली हाेती, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com