agriculture news in marathi Farmers of agricultural inputs Receipt, appeal to the Department of Agriculture | Agrowon

शेतकऱ्यांनो कृषी निविष्ठांची पावती घ्या, कृषी विभागाचे आवाहन

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

नांदेड : शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामासाठी खते, बि-बियाणे, कीटकनाशके आदी निविष्ठांची खरेदी केल्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून संपूर्ण विवरणासह बिल पावती घ्यावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले. 

नांदेड : शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामासाठी खते, बि-बियाणे, कीटकनाशके आदी निविष्ठांची खरेदी केल्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून संपूर्ण विवरणासह बिल पावती घ्यावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले. 

बनावट, बोगस निविष्ठामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खते, बि, बियाणे, किटकनाशके खरेदी करताना दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने गुणवत्ता व चांगल्या दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कृषी निविष्ठा विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी सीलबंद, वेष्टनातील, लेबल असलेले बियाणे खरेदी करावे. वैध मुदतीची खात्री करावी. पिशवीवर नमूद एमआरपी दरापेक्षा जास्त दराने खरेदी करू नये. खरेदी केलेल्या बियाण्यांचे पीक, वाण, लॉट नंबर, वजन, बियाणे उत्पादक कंपनीचे नाव, किमान किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, विक्रेत्याचे नाव व सही असलेली रोख अथवा उधारीची पावती घ्यावी. 

ही पावती तसेच वेष्टन बॅग, त्यावरील लेबल तसेच त्यातील थोडे बियाणे हे घटक पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. काही शंका असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे धर्माबाद येथील तालूका कृषी अधिकारी माधुरी उदावंत, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास अधापूरे यांनी केले.  

 


इतर बातम्या
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...