Agriculture news in marathi To the farmers of Akola Give the benefit of soybean crop insurance | Agrowon

अकोल्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविम्याचा लाभ द्या

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून सोयाबीनचे पीक गेले. त्यामुळे पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

अकोला : मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून सोयाबीनचे पीक गेले. त्यामुळे पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. सोयाबीन पीक विम्याच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे. मागणी मान्य न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

संघटनेने म्हटले आहे, ‘‘मागील वर्षात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मूग, तूर, कपाशीसह सोयाबीनच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. पावसामुळे अनेक गावांतील पिके पाण्याखाली गेल्यामुळे जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर करण्यात आली. या स्थितीत शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेचा आधार मिळेल, अशी अपेक्षा होती.

मागील वर्षी जिल्ह्यातील २ लाख ६३ हजार ९९३ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी १ लाख ३० हजार २१ शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पीकविमा काढला. त्यासाठी शेतकऱ्यांनी १२ कोटी ४ लाख रुपये प्रिमीयम भरला व राज्य शासनाने ४४ कोटी ९६ लाख, केंद्र सरकारने ४४ कोटी ९६ लाख, असा एकूण ८९ कोटी ८६ लाख रुपये इतका प्रीमिअम एकट्या सोयाबीन या पिकासाठी विमा कंपनीकडे भरणा केला.

त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. परंतु केवळ २ हजार ९५७ शेतकऱ्यांना विमा जाहीर करण्यात आला. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, सदर अन्याय दूर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर, बाळापूर तालुका अध्यक्ष पंकज दुतोंडे, गणेश भटकर, मंगेश गावंडे, विलास लोहाटे, शुभम लव्हाळे, संदीप काळमेध, शुभम खराटे व इतरांची उपस्थिती होती.

फक्त पन्नास कोटींचा परतवा दिला
२०२०-२१या वर्षात पीकविमा कंपनीने अकोला जिल्ह्यातून १३८ कोटी ६८ लाख रुपये प्रिमीयम वसूल केला. पीकविमा जाहीर करताना ८०० कोटींचे कव्हरेज असताना सुद्धा केवळ ७७ कोटी ९० लाख रुपये विमा जाहीर केला. त्यापैकी प्रत्यक्षात केवळ ५० कोटी ४ लाख विमा शेतकऱ्यांना दिला, असा दावा संघटनेने  केला आहे.


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...