Agriculture news in marathi Farmers in Akola struggle to get onion seeds | Agrowon

कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात शेतकऱ्यांची ओढाताण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली आहे. शेतकऱ्यांची बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी ओढाताण सुरु आहे. सध्या कांदा बियाणे मिळत नसल्याने शेतकरी सर्वत्र शोधाशोध करीत आहेत.

अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली आहे. शेतकऱ्यांची बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी ओढाताण सुरु आहे. सध्या कांदा बियाणे मिळत नसल्याने शेतकरी सर्वत्र शोधाशोध करीत आहेत. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाकडे उपलब्ध असलेले तीन-चार क्विंटल बियाणे विकून झाले आहे.

बाजारपेठेत कांद्याला मिळत असलेले दर, आगामी काळातील भावाचा कल लक्षात घेत शेतकरी कांदा लागवडीच्या तयारीला लागले आहेत. या भागात पांढरा कांदा लागवडीला शेतकऱ्यांची पसंती राहते. या कांद्याचे बियाणेच सध्या मिळत नसल्याने शेतकरी जागोजागी संपर्क साधत आहेत. लाल कांद्याचे बियाणे कंपन्यांनी उपलब्ध करुन दिले आहे. हे बियाणेही महाग झाले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाकडे यंदा तीन-चार क्विंटल बियाणे उपलब्ध होते. या महिन्यात सुरुवातीलाच हे बियाणे १५०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाले. सध्या विद्यापिठात बियाण्यांसाठी सातत्याने चौकशी केली जात आहे. दरवर्षी इतकी मागणी राहत नाही. यंदा शेतकऱ्यांकडून मागणी होत असल्याचे विद्यापिठातील सूत्रांनी सांगितले.

बीजोत्पादनाकडे कल

वऱ्हाडात अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन केले जाते. सध्या काही खासगी कंपन्यांनी बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांसोबत करार सुरु केले आहेत. लागवडीसाठी कांदा २००० रुपये क्विंटल आणि त्यापासून तयार होणारे बियाणे ३५ ते ४० हजार रुपये क्विंटलने खरेदी करण्यात येईल, असे या कराराचे स्वरुप असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या भागात दरवर्षी कांदा लागवड, बीजोत्पादनाचे क्षेत्र विस्तारत आहे.


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...
सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलेसातारा ः दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी...
नुकसानग्रस्तांना अधिकाधिक लाभ द्या :...भंडारा : ‘‘अतिवृष्टी व अवेळी आलेल्या...
नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची डाळिंब...नगर : दुष्काळ आणि यंदा अतीवृष्टी, तेल्या आणि...
पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : जिल्ह्यात पावसाच्या कमी अधिक स्वरूपात पाऊस...
मराठवाड्यात पीकविमा, नुकसानभरपाई मान्य...नांदेड : ‘‘जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात...