सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण पिढी, शेतकरी अस्वस्थ : पवार

चुकीच्या धोरणांने तरुण पिढी, शेतकरी अस्वस्थ
चुकीच्या धोरणांने तरुण पिढी, शेतकरी अस्वस्थ

बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा कार्यक्रम राबविला नाही. तसेच उद्योग बंद पडत असल्याने बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे राज्यात तरुण पिढी व शेतकरी अस्वस्थ असल्याचे आपण पाहत आहोत. याला सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याची टीका ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.

बीड जिल्ह्यात मुक्कामी असलेल्या शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १८) राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यात श्री. पवार बोलत होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, महिला आघाडीच्या रूपाली चाकणकर, युवक आघाडीचे महबूब शेख, डॉक्टर आघाडीचे डॉ. नरेंद्र काळे उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, ‘‘राज्यात यंदा १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. घामाने पिकविलेल्या मालाची किंमत मिळत नाही, त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने शेतकरी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. आपण केंद्रात मंत्री असताना ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. या सरकारने दिलेल्या कर्जमाफीत ऑनलाइमुळे केवळ ४० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून, ६० टक्के शेतकऱ्यांच्या डोक्यावर अद्यापही कर्जाचा बोजा असल्याचे पवार म्हणाले. 

पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना धनंजय मुंडेंच्या होमपिचवर राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर केली. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेवराई- विजयसिंह पंडित, केज- नमिता मुंदडा, बीड- संदीप क्षीरसागर, माजलगाव- प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार पवारांनी जाहीर केले. आष्टी मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु असे पवारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com