agriculture news in Marathi farmers anger due to market stopped Maharashtra | Agrowon

बाजार रोखल्याने शेतकरी संतप्त

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 एप्रिल 2020

मुंबई, पुण्यासह काही ठिकाणच्या बाजार समित्या बंद आहेत, ती तेथील गरज आहे. वास्तविक शेतकरी व अडत व्यापारी यांच्या समन्वयातून भाजीपाला पोचविण्याचे काम करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्याला राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. मोठ्या शहरात भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंची कमतरता पडू देणार नाही.
— बाळासाहेब पाटील, सहकार व पणन मंत्री

पुणे ः कोरोना संसर्गाचा बाऊ करून कोणताही ठोस पर्याय न देता मुंबई, पुण्यासह महत्वाच्या बाजार समित्याच बंद केल्याने राज्यातील भाजीपाला व फळे उत्पादक शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांनी कष्ट आणि भांडवलाचे सिंचन करून केलेला कोट्यवधी रुपयांचा भाजीपाला आणि फळे शेतातच नासत आहेत. 

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी उभारलेल्या आणि अत्यावश्यक सेवेचा भाग असलेल्या बाजार समित्या बंद करण्याचा व्यापारी, आडते यांसारख्या घटकांच्या दबावाखाली घेतलेला निर्णय आततायीपणाचा असल्याची टीका शेतकरी वर्गातून होत आहे. खरेदी-विक्रीच्या विकेंद्रीकरणासह अनेक पर्याय अवलंबून ही व्यवस्था सुरू नाही ठेवली तर शेतकऱ्यांचे नुकसान तर होईलच, त्याचबरोबर पुरवठा साखळी विस्कळित झाली तर ग्राहकांच्याही रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल.  
  
लॉकडाऊनच्या काळात मजूर, वाहतूक, इंधन आदी संकटांवर मात करून मोठ्या शहरांतील बाजारात शेतीमाल पाठवून चार पैसे मिळत होते. परंतु, पुणे, मुंबई आणि यांसारख्या अन्य महत्वाच्या बाजारपेठा बंद केल्याने शेतमाल विक्री व्यवस्थाच कोलमडली आहे. फळे आणि भाजीपाला नाशवंत असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. थेट विक्रीलाही मर्यादा असल्याने फळे आणि भाजीपाला फेकावा लागणार आहे.

शेतकरी म्हणतात...

 • बाजार समित्या बंद करणे हा कोरोना संसर्ग रोखण्यावरचा एकमेव उपाय नाही
 • कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून बाजार समित्या सुरू करा   
 • गर्दी टाळण्यासाठी छोटे-छोटे पर्यायी बाजार उभे करावेत
 • थेट विक्रीसाठी शेतकऱ्याला जागा उपलब्ध करून द्यावी
 • ...अन्यथा सरकारनेच शेतीमाल खरेदी करुन विक्री करावी
 • शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी
 • पोलिसांनी अडवणूक थांबवून शेतमजुरांना दुसऱ्या गावात जाण्याची परवानगी द्यावी

बाजार समित्या ‘बंद'चा परिणाम

 • शेतमाल विक्रीसाठी पर्यायी व्यवस्थाच नाही
 • मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये शेतीमाल थेट विक्री करण्याला मर्यादा
 • ऑनलाइन विक्रीवरही मर्यादा
 • विक्री होत नसल्याने फळे, भाजीपाला फेकून देण्याची वेळ
 • अनेक ठिकाणी भाजीपाला प्लॉटमध्ये सोडली जनावरे
 • कवडीमोल दराने व्यापाऱ्यांकडून फळांची मागणी
 • पिकावर केलेला लाखो रुपयांचा खर्च जाणार वाया

या पिकांना बसतोय फटका
फळे ः
द्राक्ष, आंबा, मोसंबी, संत्रा, पपई, चिकू, कलिंगड, खरबूज, पेरू, लिंबू
भाजीपाला :  मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, लालमाठ आदी
फळभाज्या ः टोमॅटो, मिरची, कांदा, गवार, गाजर, वांगी, काकडी, भेंडी, कारली, दोडका, शेवगा, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, बाटाटा बीट आदी.

प्रतिक्रिया
सव्वा एकर क्षेत्रावरील कोबीचे पीक काढणीला आलेले आहे. परंतु मुंबई, पुण्याच्या बाजार समित्या बंद असल्याने माल तयार होऊनही आम्ही त्याची अद्याप काढणी केली नाही. दोन-तीन दिवसांमध्ये जर कोबी काढला नाही तर खराब होण्याची दाट शक्यता आहे. सध्या आमच्याकडे विक्रीची कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. जर मार्केट वेळेवर सुरू नाही झाले तर किरकोळ प्रमाणात विक्रीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. तेही जमले नाही तर कोबी उपटून त्याचे खत केरण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. म्हणून बाजार समित्या बंद ठेवणे हा पर्याय होऊ शकत नाही. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून काही काळ तरी बाजार समित्या सुरू राहणे आवश्यक आहे.
— उदय आलमाने, दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांना हाफ पगार, फुल पगार मिळणार आहे. पण शेतकऱ्यांना काय मिळणार? शेतीमाल काढणीस तयार आहे, पण मार्केट बंद आहे. एकीकडे ग्राहकांना भाजीपाला मिळत नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री व्यवस्था नाही. पिकात जनावरे सोडण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासनाने त्याचे पंचनामे करून भरपाई द्यावी. अन्यथा बाजार समित्या चालू कराव्यात. 
— संदीप सुक्रे, प्रगतिशील शेतकरी, केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे 

गावशिवारात पाण्याचे संकट असल्याने दुसऱ्या तालुक्यातील गावात पाण्याची सोय असलेली दहा एकर शेती ठोक्याने केली. या शेतीत चार एकरावर टोमॅटो, साडेपाच एकरात कांद्याची लागवड केली. दर दिवशी दीडशे ते दोनशे कॅरेट निघणारा टोमॅटो पुणे, सुरत, मुंबई, कल्याण, अमरावती, नांदेड, परभणी, नागपूर आदी ठिकाणी बाजारपेठेत पाठवायचो. परंतु आता या बाजारपेठा बंद आहेत. शेतीवर आठ लाख खर्च झाले अन् ते वसूल कसे करावे हा प्रश्न आहे. माल आहे पण काढता किंवा विकता येत नाही. सरकारनं आमची अडचण लक्षात घेऊन मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठा उपलब्ध करण्यासह मजुरांना शेतीकामासाठी कोणत्याही गाव शिवारात जाण्यासाठी निर्भय वातावरण निर्माण होईल असे पाहावे.
— संदीप गवळी, भाजीपाला उत्पादक, माळीवडगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...