वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण विरोधात रस्त्यावर 

संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.२६) सटाणा येथे राष्ट्रीय महामार्गावर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन छेडले होते. या वेळी शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात रस्त्यावर येऊन धोरणाचा निषेध केला.
Farmers angry over power issue On the road against MSEDCL
Farmers angry over power issue On the road against MSEDCL

नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत वीजबिल वसुलीसाठी शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.२६) सटाणा येथे राष्ट्रीय महामार्गावर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन छेडले होते. या वेळी शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात रस्त्यावर येऊन धोरणाचा निषेध केला.                 महावितरणकडून जिल्हाभरात शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे थकीत वीजबिल वसुली सुरू केली असून, त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर असलेले रोहित्रे बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप बोरसे यांनी शेतीपंपाच्या वीज जोडण्या खंडित करण्याचा प्रकार न थांबविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आमदार दिलीप बोरसे, भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा आदींसह शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदी पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पुकारलेल्या या रास्ता रोकोमुळे चौफुलीवरील चारही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.    सध्या कांदा लागवडी सुरू आहे. पाच-सहा तासही सलग विद्युत पुरवठा होत नसल्याने अडचणी येत आहे. त्यातच ‘महावितरण’कडून सक्तीची वीजबिल वसुली सुरू करून शेतकऱ्यांच्या बांधावरील विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून ठिय्या दिला.  पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी दाखल होत बंदोबस्त तैनात ठेवला. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अभिमन पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष आहिरे, भाजपचे नेते डॉ. विलास बच्छाव, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक देवरे आदींनी मनोगत व्यक्त करून सक्तीची वीजबिल वसुली व विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या धोरणाचा जाहीर निषेध केला. 

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे  ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता सतीश बोंडे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. शेतकरी आंदोलकांच्या भावना वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या वेळी पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकरी नेते भास्कर सोनवणे, प्रहार शेतकरी संघटनेचे किरण मोरे, ‘स्वाभिमानी’चे तालुकाध्यक्ष रमेश आहिरे, केदाबापू काकुळते, सुरेश मोरे, बापूराज खरे, राजू पवार, दीपक मोरे, सनी शर्मा, नीलेश धोडगे, किरण ठाकरे, हेमंत सोनवणे, अतुल पवार, दिलीप पुढारी, विनोद अहिरे, अरुण देवरे, दीपक देवरे, प्रकाश देवरे आदींसह तालुका भरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com