दर्यापूरमधील ७६ शेतकरी अनुदानापासून वंचित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती  ः बॅंक खाते आधारकार्डाशी लिंक नसल्याचे कारण देत दर्यापूर तालुक्‍यातील ७६ शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नाफेडला हरभरा व तूर विकू न शकलेल्या या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार होते. 

गेल्या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा व तूर विक्रीकरिता नाफेडकडे ऑनलाइन नोंदणी केली होती. खरेदीचा कालावधी संपुष्टात आल्याचे कारण देत नोंदणी केलेल्या यातील बहुतांश शेतकऱ्यांचा माल नाफेडकडून खरेदीच करण्यात आला नाही. बाजारात हमीभावापेक्षा कमी दर असल्याने शेतकऱ्यांचे या प्रकारात दुहेरी नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रशासनाप्रती रोष होता. त्याची दखल घेत शासनाने हा रोष शमविण्यासाठी नोंदणी केलेल्या; परंतु शेतमाल विक्रीस असमर्थ ठरलेल्या शेतकऱ्यांना क्‍विंटलमागे एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्‍कम जमा झाली.

परंतु दर्यापूर तालुक्‍यातील ७६ शेतकरी मात्र अनुदानापासून वंचित राहिले आहेत.  दरम्यान, खरेदी-विक्री संघाने या संदर्भात खुलासा करताना या शेतकऱ्यांचे बॅंक खाते आधार लिंक नसल्याची माहिती दिली. अनुदानापासून वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांना बॅंक खाते आधार लिंक करण्यासाठी पत्र पाठविण्यात आल्याचेही खरेदी-विक्री संघाकडून सांगण्यात आले. खरेदी-विक्री संघाच्या पत्रव्यवहारानंतर काही शेतकऱ्यांनी आपले खाते आधार लिंक केले. मात्र, अशा खात्यांमध्ये देखील पैसे जमा झाले नसल्याचा आरोप आता होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com