अकोला : अत्यल्प पीकविमा मिळाल्याने शेतकरी नाराज

अत्यल्प पीकविमा मिळाल्याने शेतकरी नाराज
अत्यल्प पीकविमा मिळाल्याने शेतकरी नाराज

अकोला  ः यंदाच्या खरिपात नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील सोयाबीन व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत जाहीर झाली आहे. जिल्ह्यात सुमारे १३९ कोटी रुपये मिळाले असून, खातेदारांच्या बॅंक खात्यात ही रक्कम वळती करण्यात आली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना नुकसानीच्या तुलनेत अल्प मोबदला मिळाल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे.  नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान पीकविमा योजना राबविली जाते. याही हंगामात जिल्ह्यातील अडीच लाखांवर शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. विमा कंपनीकडून ज्वारी व सोयाबीन पिकासाठी पीकविम्याची १३९ कोटी रुपये रक्कम जाहीर झाली. हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा सुद्धा केला जात आहे. शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज धडकत आहेत. त्यामध्ये विमा मिळाल्याचा आकडा बघून अनेकांचा हिरमोड झाला आहे.  

माझे या वर्षी साडेतीन एकर सोयाबीन होते. त्यातून मला अवघे ७० किलो सोयाबीन झाले. मी सोयाबीन पिकाचा ११६५ रुपये विमा हप्ता भरला होता. माझे १०० टक्के नुकसान झाल्याने योग्य ती भरपाई मिळेल, अशी आशा होती; परंतु अवघे ४६०० एवढे मला विमा कंपनीकडून प्राप्त झाले आहेत.  - सुनील पाडुरंग जायले, अकोली जहांगीर जि. अकोला जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता अत्यंत जुजबी मिळाला आहे. जर शेतकऱ्याने एक रुपया प्रीमियम भरला असेल तर त्या तुलनेत त्याला २५ पैसेही मोबदला दिला गेला नाही. जिल्ह्यात असे हजारो शेतकरी आहेत. आम्ही याबाबत विमा कंपनी, कृषी विभागाकडे जाब विचारणार आहोत.  - विलास ताथोड, सोशल मीडियाप्रमुख, शेतकरी संघटना, अकोला या वर्षी पीक काढणीला आले असताना अतिपावसामुळे पूर्ण सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर मारण्याची वेळ आली होती. मी ५ एकरांचा विमा काढला होता आणि मला फक्त ७००० रुपये एवढी नुकसानभरपाई मिळाली. यातून खर्चही निघाला नाही.   - विनोद शांताराम महल्ले, बोर्डी जि. अकोला  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com