खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे शेतकरी नाराज

Farmers are offended by the rise and down in onion prices in Khandesh
Farmers are offended by the rise and down in onion prices in Khandesh

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मागील महिनाभरापासून स्थिर आहे. दरांत मात्र चढउतार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

ऑक्‍टोबरमध्ये लागवडीच्या कांद्याची काढणी काहीशी उशिराने झाली. या कांद्याची साठवणूक काही शेतकऱ्यांनी करून ठेवली होती. त्याची आवक सुरू आहे. जळगाव, धुळे, चाळीसगाव, साक्री (जि. धुळे), अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल) येथील बाजारात कांद्याची आवक स्थिर आहे. या बाजारांमध्ये रोज सरासरी चार हजार क्विंटल कांद्याची आवक मागील आठवडाभरात झाली आहे. सर्वाधिक आवक साक्री, जळगाव, अडावद, धुळे येथील बाजारात होत आहे. तर, किनगाव, चाळीसगाव बाजारातील आवक कमी झाली आहे. 

मागील वर्षी जळगावच्या बाजारात डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यात पांढऱ्या कांद्याचीदेखील आवक होत होती. यंदा पाढऱ्या कांद्याची आवक नगण्यच आहे. लाल कांद्याला जळगावच्या बाजारात मागील १० ते १२ दिवसांपासून प्रतिक्विंटल १२०० ते २२०० रुपये दर मिळत आहे. कांद्याची अधिक वेळ साठवणूक करता येत नसल्याने त्याची विक्री शेतकरी करीत आहेत.

मध्यप्रदेशातही आवक वाढली

आवक औरंगाबाद, जालना, बुलडाण्यासह जळगाव, चोपडा, भुसावळ, यावल, धुळे, पाचोरा आदी भागांतून होत आहे. काही शेतकरी हमीचे दर मिळतील, यासाठी कांद्याची पाठवणूक मध्य प्रदेशातील बडवानी, इंदूर व नाशिक जिल्ह्यांतील लासलगावच्या बाजारात करीत आहेत. परंतु, तेथेही अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती आहे. मध्य प्रदेशातही कांद्याची तेथील स्थानिक भागातून आवक वाढली आहे, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com