सहापदरी महामार्गामुळे शेतकरी अस्वस्थ

यापूर्वीच उरमोडी, तारळी धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी जमिनींवर स्लॅब टाकले आहेत. तसेच उरमोडी, तारळी धरणांच्या कालव्यासाठीही सातारा तालुक्‍यातील जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यात आता महामार्गाची भर पडणार असून, त्यामुळे बहुतेक शेतकरी भूमिहीन होतील. - बाबासाहेब माने शेतकरी, काशीळ.
सहापदरी महामार्गामुळे शेतकरी अस्वस्थ
सहापदरी महामार्गामुळे शेतकरी अस्वस्थ

सातारा : सातारा ते कागल महामार्ग क्रमांक ४८ चे सहापदरीकरणाची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३१ गावांतील शेतकरी, रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तब्बल ४१ हेक्‍टर क्षेत्राचे भूसंपादन करण्याची नोटीस काढल्याने बागायत शेती, तसेच शेकडो घरे जमीनदोस्त होणार आहेत. यामुळे अनेकजण बेघर, भूमिहीन होणार आहेत.

सातारा ते पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आहे. आता सातारा ते कागल (वळसे, ता. सातारा ते मालखेड, ता. कऱ्हाड) या महामार्गाच्या सहापदरीकरणास मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ३१ गावांमधील महामार्गालगतच्या ४१ हेक्‍टर २८ गुंठे क्षेत्राचे भूसंपादन करण्याबाबत महामार्ग मंत्रालयाने जाहिरातद्वारे नोटीस काढली आहे. शेतजमीन त्यात जात असल्यामुळे शेतकऱ्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ येणार आहे. शिवाय, अनेक हॉटेल्स, मंगल कार्यालय, दुकान गाळे यांच्याही जमिनी जाणार असल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे. भूसंपादन विभागाने ऑगस्टमध्ये मोजणी मागविली होती. मात्र, महामार्ग विभागाने त्याचे शुल्क न भरल्याने अद्यापही त्याची मोजणी आली नाही. 

जानेवारीमध्ये मोजणी होणार असून, त्यानंतर नेमके किती क्षेत्राचे अधिग्रहण केले जाणार आहे, ते निश्‍चित होईल. काही ठिकाणी मॉल्स होणार असल्याने तेथे महामार्गालगत जास्त जमिनीचे अधिग्रहण होईल,'' असे प्रकल्प व्यवस्थापक बाळासाहेब साळुंखे यांनी सांगितले. 

३१ गावांचे जाणार क्षेत्र  वळसे, भरतगाव, भरतगाववाडी, बोरगाव, नागठाणे, अतीत, खोडद, काशीळ, रामकृष्णनगर (ता. सातारा), उंब्रज, भोसलेवाडी, वहागाव, वराडे, तासवडे, शिवडे, पेरले, कोर्टी, मुंढे, खोडशी, गोटे, वारुंजी, मलकापूर, बेलवडे हवेली, वाठार, नारायणवाडी, जखीणवाडी, भुयाचीवाडी, नांदलापूर, कापील (पाचवड), आटके, मालखेड (ता. कऱ्हाड).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com