खानदेशात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची वणवण सुरु...

खानदेशात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची वणवण
खानदेशात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची वणवण

जळगाव : खानदेशात खरिपात पीक कर्ज वितरणाची गती कमी अाहे.  कर्जमाफीच्या लाभार्थींना कर्जासाठी बॅंकांकडे चकरा माराव्या लागत आहेत. धुळे जिल्ह्यात फक्त १८ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात फक्त २५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून चालढकल सुरूच आहे. धुळे जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका व जिल्हा बॅंकेला मिळून सुमारे ८०० कोटी पीक कर्ज वितरित करायचे आहे. यातील १८ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी तर १०० कोटींपर्यंतही पीक कर्ज वितरित केलेले नाही. धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मध्यंतरी गावोगावी जाऊन पीक कर्ज मेळावे घेतले. त्याचाही फारसा सकारात्मक परिणाम झालेला दिसत नाही.  

जळगाव जिल्ह्यातही सुमारे १३०० कोटी पीक कर्ज वितरित करायचे आहे. यात जिल्हा बॅंकेचे कर्ज वाटपाची टक्केवारी बरी आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांना सुमारे ६०० कोटी कर्ज वितरणाचा लक्ष्यांक असताना या बॅंकांनी ३०० कोटी कर्ज वितरित केले आहे.

  कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची अडवणूक

कर्जमाफीच्या लाभार्थींना सर्वाधिक अडचण होत असून, त्यांना नव्याने पीक कर्ज मिळालेले नाही. सोसायट्या कर्ज फेडल्याचे दाखले देत नाहीत. स्टेट बॅंकेच्या कृषी विकास शाखेत, अग्रणी बॅंकेत शेतकरी चकरा मारीत आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे २ लाख आणि धुळे जिल्ह्यात सुमारे ६० ते ६५  हजार शेतकरी कर्जापासून वंचित आहेत.

प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष   पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना वणवण करायला लावू नका, पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्या, कर्ज नाकारल्यास त्याची सूचना १५ दिवसांपूर्वीच संबंधित शेतकऱ्याला लेखी स्वरूपात द्या, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्याचे पालन बॅंका करीत नसल्याची स्थिती आहे. जिल्हास्तरावरील मुख्य शाखेत, कृषी शाखेत जा, अशी उत्तरे तालुकास्तरावरील शाखांमधील अधिकारी शेतकऱ्यांना देत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com