Agriculture News in Marathi Farmers Association did Holi of wrong electricity bills | Agrowon

शेतकरी संघटनेने केली  चुकीच्या वीजबिलांची होळी 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कृषिपंपांच्या जोडण्या तोडण्याचा सपाटा लावला आहे.

बुलडाणा : थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कृषिपंपांच्या जोडण्या तोडण्याचा सपाटा लावला आहे. परंतु शेतकऱ्यांना दिलेली बिले सदोष असून, जोपर्यंत ही बिले दुरुस्त होत नाही, तोपर्यंत एकाही कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये; अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा देत शेतकरी संघटनेने दिला. चुकीच्या वीज बिलांची महावितरण कार्यालयासमोर प्रतिकात्मक होळी केली. धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले. 

येथील चिखली मार्गावरील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर शेतकरी संघटनेने सकाळपासून धरणे आंदोलन केले. दुपारनंतर शेतकरी संघटनेचे राज्य नेते नामदेवराव जाधव यांच्या नेतृत्वात वीजबिलांची होळी करण्यात आली. चुकीची वीजबिले खपवून घेणार नाही, अशी भूमिका या वेळी जाधव यांनी मांडली. महावितरण कृषिपंपांच्या थकीत बिलापोटी वीजपुरवठा कापण्यासाठी रोहित्रे बंद करण्याची कार्यवाही करीत आहे. शेतकऱ्यांना मे महिन्यात देण्यात आलेले कृषिपंपांचे वीजबिल हे नियमबाहाय व तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे. कृषिपंपांचे वीजबिल मीटर रीडिंग न घेता सरासरीने दिले असून, ते वीज नियामक मंडळाच्या कायद्यानुसार चुकीचे आहे. ज्या शेतकऱ्यांना अश्‍वशक्तीप्रमाणे वीजबिल दिले जाते त्यांनी चुकीचे दिले. बिलात पूर्ण वर्षभर वीज वापर केला, असे गृहीत धरून आकारणी केली आहे.

शेतकरी पावसाळ्याचे चार महिने कृषिपंपांचा वापर करीत नाहीत. उन्हाळ्यात ३ महिने शेतात विहिरींना पाणी राहत नसल्याने ओलितासाठी वापर करीत नाही. त्यामुळे वापर न केलेल्या विजेच्या रक्कमेची शेतकऱ्यांकडून मागणी करणे पूर्णतः बेकायदा आहे. अश्‍वशक्तीप्रमाणे वीजबिल आकारणी २४ तास वीजपुरवठा केला, असे गृहीत धरून केलेली. वास्तविक कृषिपंपांना वीजपुरवठा दिवसातून ८ तास होत आहे. त्यामुळे संपूर्ण बिल बेकायदा आहे, असाही संघटनेने दावा केला आहे.  


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...