खानदेशात शेतकरी संघटनेतर्फे ‘कापूस जाळा, कांदा दर’ आंदोलन

जळगावः कापसाची सरसकट व १०० टक्के खरेदी केंद्र व राज्य सरकारने अखेरपर्यंत करावी, नॉन एफएक्‍यू (कमी दर्जा) कापसाला खरेदी केंद्रात नाकारू नये, कांद्याचीदेखील नाफेड व इतर संस्थांनी सरसकट खरेदी करावी, या मागण्यांसाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता.२२) कापूस जाळा व कांदा दर आंदोलन करण्यात आले .
By Farmers Association in Khandesh ‘Cotton burn, onion price’ movement
By Farmers Association in Khandesh ‘Cotton burn, onion price’ movement

जळगाव ः कापसाची सरसकट व १०० टक्के खरेदी केंद्र व राज्य सरकारने अखेरपर्यंत करावी, नॉन एफएक्‍यू (कमी दर्जा) कापसाला खरेदी केंद्रात नाकारू नये, कांद्याचीदेखील नाफेड व इतर संस्थांनी सरसकट खरेदी करावी, या मागण्यांसाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता.२२) कापूस जाळा व कांदा दर आंदोलन करण्यात आले . 

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात शेणपूर, प्रतापपूर, छाईल, शिरवाडे, देगावे आदी गावांमध्ये आंदोलन झाले. संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष शशिकांत भदाणे, पोपट कुवर, भटू आकलाडे, दिलीप खैरनार, विनायक कुलकर्णी, चेतन ठाकरे, रमाकांत गांगुर्डे, गंगाधर मिठे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. जळगाव जिल्ह्यात बोदवड येथे कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. त्यात जिल्हाध्यक्ष दगडू शेळके, ईश्‍वर लिधुरे, नाना पाटील यांनी सहभाग घेतला. 

कांद्याची नाफेडतर्फे हमीभावात खरेदी करावी, अशी मागणी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी कांद्याची माळ बनवून ती गळ्यात घातली. तसेच मूठभर कापूस जाळण्यात आला आणि कापसाला हमीभाव मिळावा, त्याची शासकीय केंद्रात शेवटपर्यंत सरसकट खरेदी करावी, कमी दर्जाचा कापूस नाकारू नये, अशी मागणी करण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com