देशभरातील शेतकरी संघटना एकवटणार ः राजू शेट्टी

Farmers associations across the country will unite ः Raju shetty
Farmers associations across the country will unite ः Raju shetty

मुंबई : देशभरातील २६५ शेतकरी संघटनांच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकारी मंडळाची दोनदिवसीय महत्त्वाची बैठक येत्या १५ व १६ जानेवारी रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होत आहे, अशी माहिती बैठकीचे आयोजक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

श्री. शेट्टी म्हणाले, की केंद्र सरकारने शेतीमालाच्या बाबतीत किमान आधारभूत किमतीच्या दीडपट हमीभाव, संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकरी कामगार विरोधी धोरण, शेतीमालाच्या आयात-निर्यातीबाबतचे धरसोडीचे धोरण, तसेच देशातील शेतकऱ्यांच्या बोकांडी लादलेला आरसीईपी करार या सर्व धोरणांच्या विरोधात देशभराच्या विविध राज्यांमधील २६५ शेतकरी संघटनांच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने ८ जानेवारी रोजी संपूर्ण ग्रामीण भारत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. आता राष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या जनआंदोलनासाठी देशभरातील शेतकरी संघटना जय्यत तयारीत आहेत. 

बैठकीला समितीचे समन्वयक पिलिभीतचे माजी आमदार व उत्तर प्रदेशचे शेतकरी नेते सरदार व्ही. एम. सिंग, कार्यकारी मंडळाचे सदस्य योगेंद्र यादव (हरियाणा), कॉ. अतुलकुमार अंजान (बिहार), डॉ. आशिष मित्तल (अलाहाबाद), माजी आमदार डॉ. सुनीलम (मध्य प्रदेश), मेधाताई पाटकर, प्रतिभाताई शिंदे (नंदुरबार), माजी खासदार कॉ. हानान मौहला (पं. बंगाल), अॅड. रामपालजी जाट (राजस्थान), अॅड. आय्याकन्नूजी (तमिळनाडू), माजी आमदार राजारामसिंगजी (पाटणा, बिहार), तेजिंदर विर्क (रुद्रपूर, उत्तराखंड), प्रेमसिंग गेहलावत (हरियाना), डॉ. दर्शनपाल (पंजाब), सत्यवानजी (पंजाब/हरियाना), कविता कुरगुंटी (आंध्र प्रदेश), किरण विसा (तेलंगण), कोडीहाळ्ळी चंद्रशेखर (बंगलोर, कर्नाटक) आणि समितीचे राष्ट्रीय सचिव अॅड. अविक शा (दिल्ली) आदी उपस्थित राहणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com