agriculture news in marathi Farmers ax pomegranate orchards in Nagar district | Agrowon

नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची डाळिंब बागांवर कुऱ्हाड

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

नगर : दुष्काळ आणि यंदा अतीवृष्टी, तेल्या आणि पावसामुळे काळे डाग पडली. डाळिंब बागांवरचे संकट टळायला तयार नाही.

नगर : दुष्काळ आणि यंदा अतीवृष्टी, तेल्या आणि पावसामुळे काळे डाग पडली. डाळिंब बागांवरचे संकट टळायला तयार नाही. दोन वर्षापासून डाळिंबात तोटा होत असल्याने यंदा उत्पादन खर्चही निघाला नाही. यामुळे हतबल झालेले शेतकरी आता डाळिंब बागांवर कुऱ्हाड चालवू लागले आहेत. जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहाता, राहूरीसह अन्य ठिकाणी अनेक शेतकऱी डाळिंबाच्या बागांवर कुऱ्हाड चालवत आहेत. आतापर्यत अनेक शेतकऱ्यांनी काढून टाकल्या आहेत. 

जिल्ह्यात सर्वाधिक साधारण २५ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. राहाता, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, पाथर्डी, पारनेर तालुक्यात क्षेत्र अधिक आहे. श्रीगोंदा, कर्जतमध्ये लिंबू तर नगर तालुक्यात संत्र्याचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे नगर, राहाता, संगमनेर बाजारात डाळिंब, संत्र्यातून तर कर्जत, श्रीगोंद्यात लिंबातून मोठी उलाढाल होते. मागील पाच वर्षात तीन वेळा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अशा परिस्थितीतही फळबागा जोपासल्या. 

फळपिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी शेततळी केली. त्याचाही दुष्काळात बागा जोपासायला फायदा झाला. दोन वर्षापासून मात्र डाळिंब बागा सतत संकटात आहेत. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही डाळिंबाच्या पिकांचे सततच्या पावसाने नुकसान झाले. रोगांमुळे दर पडल्याने यंदा डाळिंब उत्पादकांना सहाशे कोटींचा फटका सोसावा लागला आहे.

शेतकऱ्यांनी आता फळबागांवर कुऱ्हाड चालवायला सुरवात केली आहे. राहुरी, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर भागात अनेक शेतकऱ्यांनी फळबागा काढून टाकल्या आहेत. विशेष म्हणजे झालेल्या नुकसानीची कृषी विभागाने फारसी दखल घेतली नसल्याची शेतकऱ्यांना खंत आहे.

‘सव्वा दोन एकरावची डाळिंबाची बाग होती. दोन-तीन वर्ष झाली, सतत पीक संकटात आहे. खर्चा इतकेही उत्पन्न मिळाले नाही. कष्ट वाया गेले. नाईलाजाने पुजा करुन बागेवर कुऱ्हाड चालवली. अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या आहेत. काही दिवसांनी बागा पहायला भेटणार नाहीत. 
- सोपानराव तांबे, शेतकरी.


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...