Agriculture news in marathi Farmers be sure about crop loan: Collector Mandhare | Agrowon

शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा : जिल्हाधिकारी मांढरे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लवकर पीक कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे. त्याबाबतचे पत्र त्यांना बँकांमार्फत देण्यात येईल. तशा सूचना बँकानाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिक कर्जाच्या बाबतीत निश्चित राहून, खरिपाची कामे वेळेत पूर्ण करावी’’, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. 

नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लवकर पीक कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे. त्याबाबतचे पत्र त्यांना बँकांमार्फत देण्यात येईल. तशा सूचना बँकानाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिक कर्जाच्या बाबतीत निश्चित राहून, खरिपाची कामे वेळेत पूर्ण करावी’’, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. 

मांढरे म्हणाले, ‘‘यंदा शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी ३ हजार ३०० कोटीचे उद्दिष्ट जिल्ह्याला दिले आहे. शेतकऱ्यांना या हंगामात शेतीची कामे करण्यासाठी वेळेत कर्ज पुरवठा करण्याबाबत सर्व बँक अधिकारी प्रयत्नशील राहतील. काही गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू होती. त्यामुळे कर्जमुक्तीची प्रकिया पूर्ण होवू शकली नाही. त्यानंतर कोरोनाचे संकट आले आणि पुढे आधारद्वारे होणारी बायोमॅट्रिक पडताळणी थांबली. संबंधित डिवाइसेस वापरण्यावर बंदी आली. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार शेतकऱ्यांची बायोमॅट्रिक पडताळणी थांबली आहे. हे सारे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. ही संख्या फार मोठी असल्याने त्यासाठी प्रयत्न करीत आहोत.’’ 

गेल्या वर्षी देखील बँकांनी उत्तम प्रकारे कर्जपुरवठा केला होता. त्याबाबत सर्व व्यावहारिक बाबींचा विचार करून सुयोग्य नियोजन करावे. त्यासाठी सर्व कनिष्ठ कर्मचारी, अधिकाऱ्यांना उद्दिष्ट वाटून देऊन त्याप्रमाणे कालबद्ध पाठपुरावा करावा, असे निर्देश उपस्थित सर्व बँक अधिकाऱ्यांना देण्यात आले.  

दर बुधवारी होणार बँकांची बैठक 

मागील आढावा बैठकीनंतर काही बँकांनी स्वयंस्फूर्तीने १०० कोटी रुपयांचे वितरणही केले आहे. ज्या बँकांकडे जास्तीचे उद्दिष्ट आहे, त्यांच्या विभागीय प्रमुखांची बैठक दर बुधवारी घेण्यात येईल. गेल्या वर्षी या प्रयोगातून १५ दिवसांतच कर्जपुरवठ्यात ३०० कोटींनी वृद्धी झाली होती. यावेळी देखील त्याच पद्धतीने कर्जपुरवठा करण्यात येईल. बँक अधिकारीदेखील त्यांच्याकडील सर्व मनुष्यबळाचा योग्य वापर करून जास्तीत जास्त कर्ज वितरण करतील, याची खात्री बाळगावी व हंगामाची तयारी करावी, असे आवाहन मांढरे यांनी केले. 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...