शेतकरी आठवडे बाजारचालक शेतकऱ्यांना गुंडांकडून मारहाण

शेतकरी आठवडे बाजारचालक शेतकऱ्यांना गुंडांकडून मारहाण
शेतकरी आठवडे बाजारचालक शेतकऱ्यांना गुंडांकडून मारहाण

पुणे : शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने बाणेर येथे चालविण्यात येणाऱ्या शेतकरी आठवडे बाजारात काही गुंडांनी भाजीपाला विक्रीस मज्जाव करत शेतकऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार नगर येथील कोरडवाहू उत्थान फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दिली आहे.  बाजार आयोजक सागर उरमुडे यांनी तक्रारीत म्हटले आहे, की आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने आम्‍ही गेली २-३ वर्षे बाणेर येथील गणराज चौकातील गेरा सोसायटी येथे दर रविवारी दुपारी ३ ते ९ पर्यंत शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन करत आहोत. मात्र, रविवारी (ता. ३) रात्री स्थानिक बादल पवार, आकाश पवार यांनी आम्हाला तुम्ही स्वतः बाजार चालवताय, तुम्ही कंपनी सभासद नाही, त्यामुळे तुम्ही आमच्या बाजारात भाजीपाला विक्री करू नये, असे सांगत मला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.  तसेच, आठवडे बाजार चालवणारे सगळे नगरसेवक माझ्या खिशात आहेत, तुझे सगळे बाजार बंद करून आम्ही चालवणार आहोत, अशी धमकी दिली. तुमची कंपनी नगरमधील आहे आणि तुम्ही नगरमधून येऊन आमच्या पोटावर पाय देत आहात. तुम्हाला परत नगरला पाठवणार अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याची उरमुडे यांनी तक्रार दिली आहे.  दरम्यान, या स्थानिकांनी शिवशंभो फार्मर्स प्रोड्युसर नावाच्या बोगस कंपनीद्वारे आठवडे बाजार सुरू असून, यासाठी त्यांनी स्थानिक नगरसेवकांना पैसे दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. हातगाडी धारकांकडून २५ हजार रुपये हे लोक स्टॉलला घेत आहेत. यांच्यावर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई करावी, अशी मागणी उरमुडे यांनी केली आहे.   या तक्रारीचा तपास चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे हवालदार बी. आर. ताथवडे करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com