agriculture news in marathi, farmers become in trouble due to american fall army warm on crops, nagar, maharashtra | Agrowon

लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

पावसाचे प्रमाण कमी असल्याने मक्यासह अन्य काही पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतीशाळा घेतल्या जात आहेत. साडेबारा लाख रुपयांची कीटकनाशके उपलब्ध करून दिली आहेत. कृषी विभागातातील अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी पाहणी करत असून, गरजेनुसार कीटकनाशके उपलब्ध करून देत आहेत. याशिवाय कामगंध सापळेही लावले जात आहेत. अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.  
-विलास नलगे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर.

नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी सामना केलेल्या शेतकऱ्यांचा सावरण्याचा प्रयत्न असला तरी, शेतीतील संकटे पाठ सोडायला तयार नाहीत. जिल्ह्यातील अनेक भागांत मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. आतापर्यंत जिल्हाभरात सुमारे दहा ते बारा हजार हेक्टर क्षेत्रावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचा अंदाज असून, कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

जिल्ह्यात गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतीचे उत्पादन मिळाले नाही. त्यातच उसावर हुमणी अळी आणि कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाले. यंदा गतवर्षीच्या दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न केला जात असताना, अजूनही पुरेसा पाऊस झाला नसल्याने त्याचे परिणाम दिसून लागले आहेत. यंदा मक्यावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.

जिल्ह्यात मकाचे सरासरी क्षेत्र ५३ हजार १४१ हेक्टर असून, त्यापैकी २९ हजार ४३८ हेक्टर म्हणजे ५५.४० टक्के क्षेत्रावर यंदा आतापर्यंत पेरणी झालेली आहे. त्यात जवळपास १० ते १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. कृषी विभागाकडून लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आणि बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण केले जात असल्याचे सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांनी पीक मोडले 
जिल्ह्यातील उत्तर भागात मक्याचे क्षेत्र अधिक असते. कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील काही शेतकऱ्यांनी अळीचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रावरील मका पीक मोडून टाकले आहे. अनेक भागांत मक्याचा कुक्कुटपालनासाठी खाद्य म्हणून उपयोग केला जातो. त्यामुळे कुक्कुटपालनही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मक्याच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी रांजणगाव देशमुख परिसरातील शरद देशमुख, नितीन शिंदे, गणेश गोरडे, भारत वरपे, दादाभाऊ वरपे, नवनाथ धाकतोडे, वीरेंद्र वरपे, बाबासाहेब खालकर, सुरेश खालकर, विजय खालकर आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
वाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरजसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचितजळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात...
‘सन्मान निधी’च्या लाभासाठी ‘आधार लिंक’...अकोला  ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या...
रत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा...रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१...
नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील चार...नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प,...
काळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी...अमरावती  ः जिल्ह्यात पावसामुळे काळवंडलेल्या...
नाशिक येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष...नाशिक  : नाशिक विभागातील सर्वसामान्य जनेतेचे...
व्हिडिओतील छेडछाड भोवली; प्रभारी सहकार...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सापडलेले पाच हजार रुपये शेतकऱ्याने केले...सातारा ः सामाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला...
नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून...मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या...
सातारा जिल्ह्याच्या विकासात सर्वांनी...सातारा  : चालू आर्थिक वर्षात विविध...
सावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे...अकोला ः वर्षानुवर्षे सावकारांकडे गहाण पडून असलेले...
कृषिमंत्री पाठविणार चार हजार सरपंचांना...मुंबई : बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी गाव अधिक...
अनिल कवडे सहकार; सौरभ राव साखर आयुक्तमुंबई : अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
पुरंदर तालुक्यातून डाळिंबाची युरोपात...गुळुंचे, जि. पुणे : कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील...
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा...कोल्हापूर : ‘रयत अ‍ॅग्रो’च्या कडकनाथ कोंबडीपालन...
द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे...सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत...