agriculture news in marathi, farmers become in trouble due to strawberry crop damage, satara, maharashtra | Page 2 ||| Agrowon

मेटगुताड परिसरात रानगव्यांकडून स्ट्रॉबेरी पीक उद्ध्वस्त

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

लांबलेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरी लागवड उशिरा झाली. त्यात लगेच उघडिपीनंतर ढगाळ हवामानामुळे स्ट्रॉबेरीवर करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे फवारणी करून पीक वाचवण्यासाठी धडपड चालू असताना रानगव्यांच्या अस्मानी संकटाने मोठे आर्थिक नुकसान झाले. नुकसानीची दखल घेऊन भरपाई मिळावी. 
- सुरेश बावळेकर, शेतकरी. 

भिलार, जि. सातारा  : लांबलेल्या पावसाने स्ट्रॉबेरी उत्पादक अडचणीत आले असतानाच आता वन्यप्राण्यांनी मेटगुताड परिसरातील स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान केले आहे. या संकटाने शेतकरी अधिकच हवालदिल झाले आहेत.

मेटगुताड (ता.महाबळेश्वर) परिसर स्ट्रॉबेरीचे माहेरघर समजले जाते. या परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक पावसाने हैराण झाले असून, स्ट्रॉबेरी पिकावरील रोगनियंत्रणासाठी फवारणीकरिता वारेमाप खर्च करीत आहेत. तो खर्च निघेल की नाही, याची काळजी न करता केवळ पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. असे असताना या परिसरात वन्य प्राण्यांचे कळपच्या कळप पिकाचे नुकसान करीत आहेत. रविवारी रात्री मेटगुताड, लिंगमळा या परिसरातील सुरेश रामचंद्र बावळेकर, संजय श्रीपती कोंढाळकर, संतोष बावळेकर, मारुती धोंडिबा बावळेकर यांच्या सुमारे दोन एकर क्षेत्रावरील स्ट्रॉबेरी शेतात रानगव्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला.

या ठिकाणी या शेतकऱ्यांनी जवळपास ५० हजार रोपांची लागवड केली आहे. मल्चिंगसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. या शेतीत रानगव्यांनी धुमाकूळ घातल्याने लागवड केलेली लाखो रुपये किमतीची सर्व रोपे वाया गेली असून, मल्चिंगसाठी केलेला खर्चही पाण्यात गेला आहे. 
स्ट्रॉबेरीबरोबरच या ठिकाणी या शेतकऱ्यांनी लावलेली फराशी, झुकेनिया या पिकांचेही नुकसान केले आहे. दरवर्षी या रानगव्यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागतो. परंतु, वन विभाग मात्र याकडे लक्ष देत नसल्याने महाबळेश्वर तालुक्‍यातील शेतकरी वन विभागावर नाराज आहे. वन विभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शासकीय पातळीवरून या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मेटगुताड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सांगलीत कांदा ३५०० ते १०१११ रुपये...सांगली : येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला...
संपूर्ण कर्जमाफी, वीजबिलमाफीबाबत...सोलापूर ः एकापाठोपाठ एका नैसर्गिक आपत्तीने...
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक नाशिक: दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा...