Agriculture news in marathi Farmers in Bhandara district are deprived of the benefit of the Kisan Samman scheme | Agrowon

भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या लाभापासून वंचित

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 जानेवारी 2020

भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा कालावधी लोटला. परंतु अद्यापही भंडारा तालुक्‍यातील खमाटा (टाकळी) येथील शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना त्वरित योजनेचा लाभा देण्यात यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. 

भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा कालावधी लोटला. परंतु अद्यापही भंडारा तालुक्‍यातील खमाटा (टाकळी) येथील शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना त्वरित योजनेचा लाभा देण्यात यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. 

सहायक निबंधकांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या विषयावर निवेदन पाठविण्यात आले. निवेदनानुसार, पंतप्रधान किसान सन्मान निध योजनेची रक्‍कम अद्यापपर्यंत बॅंक खात्यात जमा न झाल्यामुळे खमाटा येथील शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे समाधान न करताच उडवाउडवीची उत्तरे देत त्यांना गावी पाठविले जाते. त्यावरूनच तहसील कार्यालयाचे अधिकारीच योजनेच्या अंमलबजावणी संदर्भाने उदासीन असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात यावा, ऑनलाइन प्रक्रियेत काही त्रुटी असल्यास त्यातील दुरुस्तीकरिता खमाटा येथे शिबीर लावण्यात यावे अशी देखील मागणी आहे.

खमाटा ते भंडारा हे अंतर १२ किलोमीटर असून शेतकऱ्यांना तहसीलमध्ये येजा करणे परवडत नाही. यादीमध्ये घोळ करणाऱ्या व हेतुपुरस्सर शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक त्रास देऊन योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीदेखील समितीची आहे. काही शेतकऱ्यांचा समावेश अद्यापही योजनेत केलेला नाही. त्यांच्या नावाची नोंदणी करावी, असेही समितीचे म्हणणे आहे. निवेदनकर्त्यांमध्ये जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, पुरुषोत्तम गायधने, विनोद भोपे, देवराव भोपे, भाऊराव नेरकर, अशोक पवनकर, बाबूराव चौधरी, ग्यानीराम ढेंगे, विकास निंबार्ते यांचा समावेश होता.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...