Agriculture news in marathi Farmers block 'Rasta Roko' against electricity bill collection in Kalas | Agrowon

कळसमध्ये वीजबिल वसुलीविरोधात शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

कळसमध्ये, जि. पुणे ः कृषिपंपांची वीजबिल वसुली थांबवावी. वीजपुरवठा सुरळीत न केल्यास तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला व वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरकू न देण्याचा इशारा कळस (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

कळसमध्ये, जि. पुणे ः कृषिपंपांची वीजबिल वसुली थांबवावी. वीजपुरवठा सुरळीत न केल्यास तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला व वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरकू न देण्याचा इशारा कळस (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. वालचंदनगर -भिगवण रस्त्यावर गावातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. शासन व वीज कंपनीच्या विरोधात घोषणा देत वीज बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध शेतकऱ्यांनी केला. 

इंदापूर तालुक्याच्या लोकप्रतिधीनीला जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. नुसते हाय, टाटा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. रोहित्राची वीज तोडल्याने जनावरांना पिण्याचे पाणीसुद्धा देणे अवघड झाले आहे. पिके करपून चालली आहेत. गहू, हरभरा पिकांची पेरणी रखडली आहे.

दर तीन महिन्याला वीज बिल भरणे शेतकऱ्यांना शक्य नसल्याचे माहीत असूनही, वीजबिल वसुलीचा तगादा लावण्याची शासनाची भूमिका शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. 

विजेअभावी पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. जनावरांनाही पिण्याचे पाणी देणे मुश्कील आहे. 


इतर बातम्या
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...
  वखारच्या ऑनलाइन शेतीमाल तारण कर्जात...पुणे : राज्य वखार महामंडळाच्या ऑनलाइन (ब्लॉकचेन)...
हिंगोलीत सोयाबीन दरात सुधारणाहिंगोली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात ज्वारी, गहू,...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२१-...
डाळिंबाच्या सुकर वाटेसाठी गडकरी...जालना : संपूर्ण राज्यात महत्वाचे फळपीक असलेल्या...
अमरावती जिल्ह्याती ‘पीएम किसान’ची ५...अमरावती ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ...
कृष्णाकाठावर मजुरांअभावी ऊस रोपांची लागणभिलवडी, जि. सांगली ः कृष्णाकाठावर उसाच्या कांडी...
कोल्हापूर, सांगलीत ‘कृषिपंप...कोल्हापूर  : गेल्या तीन दिवसांत कोल्हापूर व...
वीज पुरवठा सुरळीत  करण्यासाठी इंदापुरात...पुणे ः जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील थकबाकीदार...
खानदेशात पीककर्ज वितरणाला येईना गतीजळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामासाठी पीक...
सोयाबीन दराची घोडदौड सुरूच राहणार पुणे ः तेलबिया आणि खाद्यतेलाच्या दारातील...
पुणे बाजार समितीचा वारणारांना चाप ः गरडपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे,...
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...