भंडाऱ्यात अखंडित विजेसाठी शेतकऱ्यांचे ‘रास्ता रोको’

भंडाऱ्यातकृषिपंपांना दहा तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी ‘रास्ता रोको’ करण्यात आले.
Farmers block road for uninterrupted power supply
Farmers block road for uninterrupted power supply

भंडारा ः कृषिपंपांना दहा तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी ‘रास्ता रोको’ करण्यात आले. साकोली तालुक्‍यातील सासरा, सानगडी संयुक्‍त किसान समितीच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच राज्य सचिव शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.  साकोली बस स्थानक चौकात यानिमित्ताने जाहीर सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संयुक्त किसान समितीचे अध्यक्ष किशोर बारस्कर होते. सभेला शैलेश गणवीर, राजू बडोले, राजेश पोवनकर, भाऊराव गोटेफोडे, विनायक नंदरधन, भास्कर ईटवले, हंसराज नगरकर, चंद्रशेखर गायधने, गोपाल पोवनकर, प्रकाश गोटेफोडे, अरुण गोटेफोडे यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर बस स्थानक चौकात रास्ता रोको करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनानंतर शिवमंदिर येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी साकोलीचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्‍वर शिंदे, डोंगरगावचे सहायक अभियंता अजय गेडाम, लेखापाल नंदकिशोर सहारे यांना निवेदन देण्यात आले त्यासोबतच कृषिपंपांच्या वीजपुरवठ्या संदर्भाने आंदोलकांनी त्यांच्याशी चर्चाही केली. त्यामध्ये त्यांनी चक्राकार पद्धतीने आठ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात येईल. काही कारणांमुळे वीज खंडित झाल्यास तेवढी वेळ वाढवून देण्यात येईल, असे सांगितले. सभेचे संचालन व झालेल्या सामूहिक चर्चेनंतर जगदीश ईटवले यांनी आभार मानले. १५ दिवसांत आश्‍वासनांची पूर्तता न झाल्यास सानगडी ते साकोली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयापर्यंत पायी मार्च काढून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. 

नवीन वीजजोडणी देणार  जळण्याच्या कारणांची माहिती घेऊन नैसर्गिक कारणांमुळे जळालेले मीटर विनामूल्य बदलण्यात येतील. यापुढे रीडिंगप्रमाणे बिल देण्यात येतील व आतापर्यंत दिलेल्या सरासरी बिलामध्ये दुरुस्ती करून देण्यात येईल. डीपीच्या व लाइनच्या देखभालीचे काम निर्धारित वेळेवरच करण्यात येतील. शासनाच्या नवीन योजनेप्रमाणे शक्‍य तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी देण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com