नगर बाजारसमितीत कांदा अनुदान अर्ज भरण्यासाठी गर्दी

कांदा अनुदान अर्ज भरण्यासाठी गर्दी
कांदा अनुदान अर्ज भरण्यासाठी गर्दी

नगर   ः कांदा अनुदानाचे अर्ज भरण्यासाठी नगर बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. या वेळी आमदार शिवाजी कर्डिले यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन अडचणी समजून घेतल्या.

राज्य सरकारने एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या अनुदानासाठी कांदाविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. १५ जानेवारीपर्यंत अर्ज भरून देता येतील. आतापर्यंत तीन हजार अर्ज भरले गेले आहेत.

सुमारे ८० टक्के शेतकरी परगावांहून येत असल्याने त्यांना बाजार समितीत काही अडचणी येतात का, यासाठी आमदार कर्डिले यांनी स्वतः भेटून त्यांची विचारपूस केली. शेतकऱ्यांनी सरकारच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी मुदतीत अर्ज भरून द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी सभापती विलास शिंदे, संदीप कर्डिले, कानिफनाथ कासार, बाळासाहेब निमसे, सचिव अभय भिसे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com