नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी शेतकऱ्यांची परवड

वेगवेगळ्या ग्रेडची संयुक्त खते मिळाली. परंतु, युरिया पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. एक, दोन बॅगच दिल्या जात आहेत. किरकोळ विक्री किंमतीपेक्षा ५० ते ६० रुपये जास्त घेतले जात आहेत. - विष्णु निर्वळ, रुढी, जि. परभणी.
 Farmers can afford fertilizers in Nanded, Parbhani and Hingoli
Farmers can afford fertilizers in Nanded, Parbhani and Hingoli

नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी केलेली खतांची मागणी आणि मंजूर खतसाठा यांच्यात १ लाख ९७ हजार ५३२ टन एवढी तफावत आहे. युरियासह अनेक ग्रेडच्या खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात वेळेवर झालेली नाही. कृत्रिम टंचाई, साठेबाजी चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकरी, विविध पक्ष, संघटनांकडून होत आहे. परंतु, त्याकडे सर्व संबंधीतांचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष्य होत आहे. त्यामुळे ऐन गरजेवेळी शेतकऱ्यांची खतांसाठी परवड सुरु आहे.

मागील महिन्यात पेरणीसाठी आणि आता दुसरी मात्रा देण्यासाठी खतांची मागणी वाढली आहे. विविध ग्रेडची संयुक्त खते मिळत आहेत. परंतु, अनेक ठिकाणी युरिया खताची साठेबाजी करुन कृत्रिम टंचाई केली जात आहे. शेतकऱ्यांना हव्या त्या प्रमाणात युरिया खत मिळत नाही. गेल्या आठवड्यात परभणी जिल्ह्यात तुटवड्यामुळे युरियाच्या एक, दोन बॅगसाठी शेतकऱ्यांवर रांगा लावण्याची वेळ आली.

या तीन जिल्ह्यातही युरियाच्या किंमतीपेक्षा प्रत्येक बॅग मागे ५० ते १२५ रुयये अतिरिक्त रक्कमेची लूट केली जात आहे. अन्य ग्रेडची खते घेतली, तर युरियाच्या एक किंवा दोन बॅग दिल्या जात आहेत. पावती छापील किंमतीची दिली जात असली, तरी एकूण रक्कम घेतल्याची कच्ची पावती दिली जात आहे. खत विक्रेते शेतकऱ्याची नड लक्षात घेऊन जादा दराने खतांची विक्री करुन शेतकऱ्यांची लुट करत आहेत.

या तीन जिल्ह्यांनी यंदा युरिया, सुपर फास्फेट, पोटॅश यासहस विविध ग्रेडच्या ४ लाख ९९ हजार ८५२ टन खतांची मागणी करण्यात आली होती. परंतु, ३ लाख २ हजार ३२० टन एवढाच खतसाठा मंजूर करण्यात आला. आजवर उपलब्ध खतांपैकी २ लाख २४ हजार ९४३ टन खताची विक्री झाली. एकूण ५२ हजार टन खतसाठा शिल्लक होता.

नांदेड जिल्ह्यात ७८ हजार २१० टन साठा मंजुर झाला. विविध ग्रेडचा एकूण १ लाख ४८ हजार ६३० टन खतसाठा उपलब्ध होता. सोमवार (ता.६) पर्यंत १ लाख १५ हजार ९८६ टन खतांची विक्री झाली. युरियाची ८७ हजार टनाची मागणी करण्यात आली. परंतु, ७८ हजार २१० टन युरियाचा साठा मंजूर झाला. एकूण ४० हजार ६७८ टन युरिया उपलब्ध होता.त्यापैकी ३६ हजार ३२६ टनाची विक्री झाली.

परभणीत गतवर्षीचा २४ हजार ७७१ आणि यंदा पुरवठा झालेला ६० हजार १४४ टन असा एकूण ८४ हजार ९१५ टन खतसाठा उपलब्ध होता. युरियाची ६० हजार ५०० टन मागणी केली. ३१ हजार २०० टन खतसाठा मंजूर झाला. एकूण २४ हजार २९८ टन युरिया उपलब्ध झाला. शनिवार (ता.११) पर्यंत २३ हजार १०० टन युरियाची विक्री झाल्यानंतर १ हजार १९८ टन युरिया शिल्लक होता. गेल्या दोन तीन दिवसांत अजून अडीच हजार टन युरियाची रेक आली. त्यामुळे उपलब्धता वाढली, असे संबंधित सूत्रांनी सांगितले. 

हिंगोली जिल्ह्यात विविध ग्रेडचा ४३ हजार ४०५  टन खतसाठा उपलब्ध होता. त्यापैकी रविवार (ता.१२) पर्यंत) एकूण ३३ हजार ४०९ टन खतांची विक्री झाली. अजून ९ हजार ९९६ टन खतसाठा शिल्लक आहे. एकूण ८ हजार ४९१ टन युरिया उपलब्ध झाला होता. त्यापैकी ७ हजार ४४९ टन युरियाची विक्री झाली.

जिल्हानिहाय खतसाठा स्थिती (टनांमध्ये)

जिल्हा  मागणी मंजुर खतसाठा उपलब्धता विक्री शिल्लक
नांदेड  २५८६०० २२७९८०  १४८६३०  ११५९८६   ३२६४४
परभणी  १५१२०० ९११७०  ८४९१५ ७५५४८  ९३६७
हिंगोली ९००५२ ६५२३० ४३४०५ ३३४०९ ९९९६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com