सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करा : शरद पवार
सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करा : शरद पवार

सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करा : शरद पवार

वाई, जि. सातारा :  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही. सातारा जिल्ह्यात थकबाकीदारांपेक्षा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा शेतकऱ्यांवर अन्याय होतो. यावर शासनाने योग्य विचार करायला हवा. सहकाराच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करून स्वतःचा पायावर उभे करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी येथे केले. तीन पक्षांचे सरकार चालविताना केवळ एकाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. एकमेकांच्या समन्वयातून राजकारणाचा गाडा ओढण्यातच राज्याचे भलं होईल, असेही ते म्हणाले. सातारा जिल्हा बँकेच्या वाई विभागीय कार्यालयाच्या व सोनगीरवाडी शाखेच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते. या वेळी सहकार व पणन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, विक्रमसिंह पाटणकर, शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. पवार म्हणाले, की स्व. यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या जिल्हा बँकेचे स्व. किसन वीर, विलासकाका पाटील, लक्ष्मणराव पाटील यांच्यासारख्या सहकारधुरीणांनी नेतृत्व केले. स्थापनेपासूनच त्यांनी बँकेचा कारभार स्वच्छ, पारदर्शकपणे व कडक शिस्तीने करण्याची दिशा दिली. आपण कृषिमंत्री असताना ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती. त्यानंतरही वेळोवेळी शासनाने कर्जमाफी करून शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने एकरी दीड लाख रुपयांपर्यंत जाहीर केलेली कर्जमाफी त्यानंतरच्या सरकारने दोन लाख रुपये केली. यामुळे राज्यातील ३२ लाख शेतकऱ्यांना २९ हजार कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष सुनील माने, संचालक नितीन पाटील, बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. प्रभाकर घार्गे यांनी आभार मानले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com