नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी फिरकेना

नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी फिरकेना
नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी फिरकेना

नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी करण्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये शासनाने नऊ हमी केंद्रे सुरू केली खरी, मात्र यंदा पहिल्यांदाच या हमी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. हमी केंद्रावर विक्री करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता दिसत नाही. असे असताना तुरीची खरेदी करण्यासाठीची तयारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू केली आहे. मात्र, मूग, उडीद व सोयाबीनची विक्री करण्याबाबत शेतकरी हमी केंद्राकडे का फिरकत नाहीत, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून जागृती झाली नाही काय, असे अनेक प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागले आहेत. 

शेतकऱ्यांच्या मालाची हमीदरानुसार खरेदी करणे बंधनकारक असताना व्यापारी कमी दराने खरेदी करत असल्याने मूग, उडीद, सोयाबीनसह अन्य शेतमालाची हमीदराने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये हमी केंद्रे सुरू झाली. मूग, उडीद, सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणी करून घेतली. नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने सातत्याने मुदतवाढ करावी लागली होती. मात्र, सुरवातीला मागणी होत असताना हमी केंद्रे सुरू करण्याबाबत हालगर्जीपणा केला. 

आता मात्र खरेदी केंद्रे सुरू केले तरी शेतकरीच केंद्राकडे फिरकायला तयार नाहीत. सातत्याने हमी केंद्राबाबत मागणी होत असताना, आता मात्र हमी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ८ हजार ४५९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असताना माल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र अवघी पंचवीस टक्के आहे. 

शासनाने मुळात खरेदी केंद्रे सुरू करण्याला उशीर केला. त्यात खेरदी करण्यासाठी ज्या अटी घातल्या त्या किचकट आहेत. मार्केटिंग फेडरेशनकडून शेतकऱ्यांनी हमी केंद्रावर माल विकावा याबाबत फारसे गांभीर्याने घेतले नाही. गतवर्षी लोकांचे पैसे राहिले त्याबाबत काळजी घेतली नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसते. - बाळासाहेब पटारे,  विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना

आकडे बोलतात

  • सोयाबीन ः १७९,
  • विक्री करणारे शेतकरी ः १, खरेदी ः ७ क्विंटल ५० किलो. 

  • मूग ः १६१६,
  • विक्री करणारे शेतकरी ः ५९५, खरेदी ः ८४५ क्विंटल 

  • उडीद ः ६६६४,
  • विक्री करणारे शेतकरी ः ७५७, खरेदी ः २०३३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com