agriculture news in marathi, Farmers captures grape traders | Agrowon

फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी पकडले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील अनेक द्राक्ष उत्पादकांची फसवणूक झाली आहे. बाहेरील व्यापाऱ्यांना बोलवून स्थानिकांचे सौदे करून देण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी द्राक्षमाल घेऊन पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. पिंपळगाव येथील प्रवीण जाधव या ट्रान्सपोर्ट चालकाच्या ओळखीने सिकंदर नावाच्या व्यापाऱ्याने परिसरात द्राक्षाचे सौदे केले. अनेक द्राक्ष उत्पादकांनी त्यांना माल दिला. मात्र सर्वांना थोडेफार पैसे व खोटे धनादेश देऊन हा व्यापारी पळून गेला. अखेर त्याला पकडण्यात शेतकऱ्यांना यश आले. 

नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील अनेक द्राक्ष उत्पादकांची फसवणूक झाली आहे. बाहेरील व्यापाऱ्यांना बोलवून स्थानिकांचे सौदे करून देण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी द्राक्षमाल घेऊन पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. पिंपळगाव येथील प्रवीण जाधव या ट्रान्सपोर्ट चालकाच्या ओळखीने सिकंदर नावाच्या व्यापाऱ्याने परिसरात द्राक्षाचे सौदे केले. अनेक द्राक्ष उत्पादकांनी त्यांना माल दिला. मात्र सर्वांना थोडेफार पैसे व खोटे धनादेश देऊन हा व्यापारी पळून गेला. अखेर त्याला पकडण्यात शेतकऱ्यांना यश आले. 

शेलू येथील द्राक्ष उत्पादक शंकर जाधव यांनी या व्यापाऱ्याला द्राक्ष विकली. ३ लाख रुपयांचा माल विकल्यानंतर यापोटी त्यांना ५० हजार रोख मिळाले अन् उर्वरित रक्कम म्हणून ५० हजारांचा धनादेश दिला. प्रवीण जाधव यांच्या नावे दिलेला धनादेश ८-९ वर्षे जुना असल्याने बँकेत वटला नाही. याबाबत शंकर जाधव हे अनेकदा वडनेर भैरव पोलिस ठाण्यात जाऊनही अधिकारी तक्रार घेत नसल्याने त्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांचाकडे धाव घेतली.

डॉ. सिंग यांनी लक्ष घातल्यावर वडनेर भैरव पोलिस स्टेशनने कारवाईस सुरुवात केली. समाधानकारक कारवाई न झाल्याने पुन्हा शंकर जाधव यांनी पोलिसांविरोधात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांत व तहसीलदार यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन यांना पत्र दिले होते. तरीही गुन्हा दाखल झाला नसल्याने जाधव यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र सर्व पाठपुरावा करून तो फोल ठरला. फरारी व्यापारी द्राक्ष उत्पादकांचे पैसे बुडवून खुलताबाद येथे पळाला होता. जवळपास पन्नासहून अधिक शेतकऱ्यांची सिकंदर या व्यापाऱ्याने फसवणूक केली आहे.

पोलिस यंत्रणा लक्ष देत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फरारी व्यापाऱ्यास पकडण्यासाठी पाळत ठेवली होती. अखेर स्वतःचा जीव धोक्यात घालून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला पकडले असून त्यास वडनेर भैरव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी पुढील चौकशीसाठी ट्रान्सपोर्ट मालक प्रवीण भाऊसाहेब जाधव यांना अटक करून चांदवड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २० एप्रिलपर्यंत दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...