जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांनी पकडले सोयाबीन चोर
घराच्या अंगणात ठेवलेले ३१ पोते सोयाबीन पळविणाऱ्या टोळीला तरुण शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले.
अमरावती : घराच्या अंगणात ठेवलेले ३१ पोते सोयाबीन पळविणाऱ्या टोळीला तरुण शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जळू येथे घडलेल्या या घटनेत चारचाकी वाहनासह चोरीचे सोयाबीन जप्त करण्यात आले.
परमानंद नारायण केकणे (वय ५०), राजेंद्र शंकर पवार (वय ३९), हिवरेश हिवराज भोसले (वय १९), किसन किशोर राठोड (वय १८, सर्व रा. आजंती बेडा, ता. नेर, यवतमाळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जळू येथील कुणाल राजेंद्र पाटील यांनी ३१ पोते सोयाबीन घराच्या अंगणात ताडपत्री झाकून ठेवले होते. पहाटे तीन वाजताच्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत असल्याने कुणाल पाटील यांना जाग आली. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता चार व्यक्ती अंगणातील पोते वाहनात भरत असल्याचे त्याच्या लक्षात आले.
कुणाल पाटील घरी एकटेच असल्याने चोरट्यांचा मुकाबला करणे शक्य नसल्याचे त्यांनी जाणले. गावातील मित्रांना त्यांनी फोनवरून ही माहिती दिली. तोपर्यंत चोरटे ३१ पोते सोयाबीन घेऊन पसार झाले होते. त्यांचा शोध घेत कुणाल पाटील व त्यांचे मित्र बडनेरा मार्गावर पोहोचले. त्यावेळी चोरटे हे एका वाहनातील सोयाबीन दुसऱ्या वाहनात भरत असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. चाहूल लागताच चोरट्यांनी पळून जायचा प्रयत्न केला. मात्र, कुणाल पाटील व त्यांच्या मित्रांनी चोरट्यांना पकडून ठेवले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी वाहनासह ३१ होते सोयाबीन जप्त करून आरोपींना अटक केली.
शेतकऱ्यांचे होत आहे कौतुक
गाव शिवारात शेतमाल तसेच गुरे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रेल्वेच्या धर्तीवर शेतमाल चोरीचे गुन्हे रोखण्याकरिता स्वतंत्र कायदा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, जळू येथील कुणाल पाटील आणि त्यांच्या मित्रांनी दाखविलेल्या धाडसाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- 1 of 653
- ››