तेलंगणमध्ये शेतकऱ्यांचे ‘टीआरएस’ला आव्हान

तेलंगणमध्ये शेतकऱ्यांचे ‘टीआरएस’ला आव्हान
तेलंगणमध्ये शेतकऱ्यांचे ‘टीआरएस’ला आव्हान

निझामाबाद, तेलंगण : तेलंगणमधील निझामाबाद लोकसभा मतदारसंघातील लढत या वेळी लक्षवेधी ठरणार आहे. येथील हळद व ज्वारी उत्पादक १७० शेतकऱ्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरले आहेत. तेलंगणमधील तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) सरकार शेतकऱ्यांना किमान हमी भाव देण्यास अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ हे पाऊल उचलले आहे. निझामाबादमधून १७० शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरून अनोख्या पद्धतीने सरकारवरील राग व्यक्त केला असून, याचा परिणाम मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या खासदार के. कविता यांच्या निवडणुकीच्या प्रचारावर होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. निझामाबाद लोकसभा मतदारसंघात त्या ‘टीआरएस’च्या उमेदवार आहेत, तर ‘टीआरएस'चे राज्यसभा सदस्य डी. श्रीनिवास यांचे चिरंजीव डी. अरविंद हे भाजपकडून लढत आहेत. काँग्रेस महासमितीचे चिटणीस मधू याशकी गौड हे काँग्रेसचे उमेदवार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com