शेतकऱ्यांची मुले विमानाने शिक्षणमंत्र्यांच्या भेटीला

जिल्हा परिषद शाळेतील शेतमजुरांच्या मुलांनी विमानप्रवास करत सहलीचा आनंद घेतला. ही मुले आयुष्यभर हा अनुभव विसरणार नाहीत - धनश्री आहेर, जि.प. सदस्या, नाशिक शिक्षक उपक्रमशील असले, तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा रुंदावतील, यात शंका नाही. - डॉ. वैशाली झनकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी
शेतकऱ्यांची मुले विमानाने शिक्षणमंत्र्यांच्या भेटीला
शेतकऱ्यांची मुले विमानाने शिक्षणमंत्र्यांच्या भेटीला

नाशिक  : जिल्हा परिषद शाळांमधील विविधांगी उपक्रम व त्यामुळे त्यांची वाढत असलेली गुणवत्ता पाहता या शाळा खासगी शाळांशी स्पर्धा करत असल्याचे चित्र सध्या अनुभवायला मिळते आहे. शाळांची स्थिती आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी वाड्या, वस्त्या, तांड्या-पाड्यांवरील शाळेतील शिक्षक पोटतिडकीने झटत आहेत. असाच एक उपक्रम फांगदर (खामखेडा, ता. देवळा) या आदिवासी वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेत राबवण्यात आला.  या वस्तीवरील २४ मुले विमानाने मुंबईला सहलीला गेली. या मुलांनी मुंबईत विधानभवन, मंत्रालय पाहत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली.

शाळा तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या विमान प्रवासाबद्दल अनुभव विचारत संवाद साधला. तुमची शाळा कशी आहे, तुम्हाला तुमच्या शाळेत काय बदल हवा आहे, असे विचारले. विद्यार्थ्यांना कविता म्हणायला लावल्या. शाळेची विद्यार्थिनी शीतल माळी हिने ''आई तुझे उपकार फिटणार नाही'' हे गीत गाऊन दाखवले. या वेळी उपक्रमशील शिक्षक खंडू मोरेलिखित ''शिक्षणाच्या वारीची यशोगाथा'' व ''छोट्यांच्या मोठ्या गोष्टी'' या पुस्तकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी नेहरू तारांगण, सी-लिंक व मुंबई दर्शन केले.  

शिक्षकांचा पुढाकार आणि त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे पालकांनी सहलीला मदत केली. शिक्षक संजय गुंजाळ, खंडु मोरे व आनंदा पवार यांनी विमानाने मुंबईला सहल काढायचा प्रस्ताव पालक आणि शिक्षण समितीसमोर ठेवला. जिल्हा परिषद सदस्या धनश्री आहेर, पुणे येथील अलका सूर्यवंशी, वडगाव तालुका देवळा येथील बळीराम देवरे यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य केले. त्याचबरोबर आमदार नरहरी झिरवळ, यांनी मुंबईत डबल डेकरने प्रवासासाठी मदत, उपनिरीक्षक आकाश पवार यांनी भोजनव्यवस्था, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मुंबईतील विद्यार्थ्यांचा निवास, जेवणाची व्यवस्था केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com