उभी पिके कापून जनावरांच्या पुढ्यात 

मार्केटमध्ये जनावरांच्या खाद्याची आवश्यक प्रमाणात उपलब्धता होत नाही. त्यामुळे जनावरांचे हाल होवु नये म्हणुन ऊभा ऊस कापुन खायला घालण्यास सुरुवात केली आहे. सरकारने लक्ष देवुन हा पुरवठा सुरळीत करावा. -धनाजी यादव, शेतकरी
crop chopping
crop chopping

कऱ्हाड ः सातारा जिल्ह्यात जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खाद्य तयार करण्याचे कारखानेच मध्यंतरी बंद राहिले. त्यामुळे आवश्यक प्रमाणात ते उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुक्या जनावरांचे खाद्याविना हाल सुरु आहेत. ते हाल बघवत नसल्याने आता अनेक शेतकऱ्यांनी उभा ऊस, मका व अन्य पिके कापून जनावरांना घालण्यास सुरुवात केली आहे.  सातारा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती करतात. त्याच्या जोडीने आता त्यांनी पालेभाज्या, फळभाज्यांच्या पिकांसह फळांची शेतीही करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसाय म्हणून आता जनावरांचाही दूध व्यवसायासाठी सांभाळ केला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात ७ लाख ३० हजार १०६ गाय व म्हैसवर्गीय जनावरे, ३ लाख ९ हजार ११ शेळ्या, २ लाख ६४ हजार २२१ मेंढ्यांची संख्या असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडे नोंद आहे. त्यांच्यासाठी खाद्याची मोठ्या प्रमाणात गरज असते. त्याअंतर्गत जिल्ह्यात लाखो रुपयांची उलाढाल होत असते.  २२ मार्चपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे एकमेकांच्या जवळ येणे बंद झाले. त्यामुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद करावे लागले. परिणामी मजुरांवर बसून राहण्याची वेळ आली आहे. कारखाने बंद राहिल्याने खाद्याचे कारखानेही बंद राहिले. त्यामुळे खाद्याची निर्मीतीही बंद झाली आहे. परिणामी खाद्य आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध झाले नाही. आहे ते खाद्य विक्रेत्यांनी विकले. 

नवीन खाद्याचा माल न आल्याने व्यापाऱ्यांपुढेही विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुक्या जनावरांचे खादयाविना हाल सुरु आहेत. ते हाल बघवत नसल्याने आता अनेक शेतकऱ्यांनी उभा ऊस, मका व अन्य पिके कापुन जनावरांना घालण्यास सुरुवात केली आहे. खाद्य उपलब्ध नसल्याने आर्थिक फटका सोसुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुकी जनावरे जगवण्यासाठी पाऊल उचलले आहे.  कोंबडी खाद्यासाठीही होतेय परवड  शेतकऱ्यांना कुकुटपालनातुन चार पैसे मिळावे म्हणून कोंबड्यापालनही केले आहे. सध्या एका गावठी कोंबडीचा दर ३०० ते ५०० च्या घरात आहे. त्यामुळे त्यातुन शेतकऱ्यांना चार पैसे चांगले मिळत आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यात १२ लाख १४ हजार १३४ गावठी कोंबड्या असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडे नोंद आहे. त्याचबरोबर मांससाठी वापरण्यात येणाऱ्या पोल्ट्रीतील कोंबड्यांची संख्या २७ लाख ६५ हजार ४७७ आहे. त्या कोंबड्यांना खाद्याची मोठी गरज असते. मात्र महिन्यापासुन त्यांच्या खाद्याचीही परवडच सुरु आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com