Agriculture news in marathi Farmers in the city will get Crop insurance of Rs | Page 2 ||| Agrowon

नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ कोटींचा पीकविमा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 जुलै 2021

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात झालेल्या नुकसानीपोटी पीकविमा योजनेतून ८ कोटी ४९ लाख ५९ हजार ६६७ रुपयांची भरपाई मिळणार आहे. २ लाख ५१ हजार ६७६ हेक्टर क्षेत्रावरील ४ लाख ६४ हजार ५४७ शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.

नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात झालेल्या नुकसानीपोटी पीकविमा योजनेतून ८ कोटी ४९ लाख ५९ हजार ६६७ रुपयांची भरपाई मिळणार आहे. २ लाख ५१ हजार ६७६ हेक्टर क्षेत्रावरील ४ लाख ६४ हजार ५४७ शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. गेल्या वर्षी केवळ शेतकऱ्यांनी विम्यापोटी भरलेल्या रकमेच्या अर्धीच रक्कम शेतकऱ्यांना विमा भरपाई म्हणून दिली जात असल्याचे दिसून येत आहे. सरकारकडून मिळालेला हप्ता वेगळाच आहे. 

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी २०२०-२१ मधील खरीप हंगामात सुरुवातीला वादळ व त्यानंतर सातत्याने पाऊस यामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होत विमा भरला. नगर जिल्ह्यात गेल्यावर्षी खरिपात २ लाख ५९ हजार ४४८ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवून ४ लाख ६६ हजार २४५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यंदाचा जुलै संपला तरी नगर गतवर्षीचा खरिपाचा विमा मिळत नसल्याने सातत्याने ओरड केली जात होती. शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनीही या बाबत सतत पाठपुरावा केला. 

आता कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार खरिपाच्या विम्याची ८ कोटी ४९ लाख ५९ हजार ६६७ रुपये नुकसान भरपाई जाहीर झाली आहे. त्यात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५ कोटी ३६ लाख १ हजार ७७३ व पीक उत्पादन कमी निघाल्याबाबत ३ कोटी ७ लाख ११ हजार ४०६ रुपये आहेत. गेल्या वर्षी मोठे नुकसान झालेले असल्याने भरीव विमा मिळेल, अशी आशा होती. मात्र ती फोल ठरली आहे. विमा कंपन्यांनी अत्यंत तोकडी रक्कम दिली आहे. 

नफेखोरी थांबविणार कधी?
नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी खरिपात ४ लाख ६६ हजार २४५ शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ४४८ हेक्टर क्षेत्राचा विमा भरला होता. शेतकऱ्यांचा हप्ता म्हणून १७ कोटी ६५ लाख रुपये भरले गेले. शिवाय सरकारचा हिस्सा मिळून मोठी रक्कम विमा कंपनीला मिळाली. त्यातून ७४५ कोटी रुपये शेतकऱ्यांचे संरक्षित झाल्याचे सांगितले गेले. यंदा प्रत्यक्षात केवळ ८ कोटी ४९ लाख ५९ हजार ६६७ रुपये विमा भरपाई मिळत असल्याचे जाहीर केले आहे. विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या व हेक्टर क्षेत्र भरपाईच्या तुलनेत ठेवले असले तरी भरपाई रकमेची टक्केवारी कमी केल्याने रक्कम घटली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने मोठे नुकसान झाले असताना टक्केवारी कमी करून विमा कंपन्यांनी नफेखोरी केली आहे.

तालुकानिहाय मिळणारी रक्कम 
अकोले ः ५७,९७,११५, जामखेड ः १,६८,२२९, कर्जत ः २७,४९,७९२, कोपरगाव ः १,६७,७०,०३८, नगर ः ८,४५,११६, नेवासा ः १,२७,१९,०८८, पारनेर ः ९,८७,९३०, पाथर्डी ः ९,०१,४८२, राहाता ः ९२,२२,१५७, राहुरी ः ८४,२२,३८५, संगमनेर ः ९, ८२,९८१, शेवगाव ः २२,२९,०३६, श्रीगोंदा ः २,०५,१३,४०६ श्रीरामपूर ः ७८,६८,३०५


इतर ताज्या घडामोडी
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...