agriculture news in marathi, Farmers committe warns government on issues | Agrowon

शेतकरी संघर्ष समिती पुन्हा रस्त्यावर उतरणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 जून 2018
मुंबई : दूध दरातील अभाव, साखरेचे कोसळलेले भाव आणि मोझांबिकमधून आयात तूरीवरुन राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला. यासंदर्भात राज्य सरकारने सात जूनपर्यंत कोणताही प्रतिसाद न दिल्यास त्यानंतर शेतकऱ्यांनी शहरांचा दूध आणि भाजीपाला पुरवठा थांबवावा असे आवाहन किसानसभेचे डॉ.अजित नवले यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 
मुंबई : दूध दरातील अभाव, साखरेचे कोसळलेले भाव आणि मोझांबिकमधून आयात तूरीवरुन राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला. यासंदर्भात राज्य सरकारने सात जूनपर्यंत कोणताही प्रतिसाद न दिल्यास त्यानंतर शेतकऱ्यांनी शहरांचा दूध आणि भाजीपाला पुरवठा थांबवावा असे आवाहन किसानसभेचे डॉ.अजित नवले यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

डॉ.नवले म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांच्या दुधाला शासनाने ठरवून दिलेला प्रति लिटर २७ रुपये दर मिळत नाही. तरीही देवेंद्र फडणवीस सरकार गुजरात आणि कर्नाटकच दूध पायघड्या घालून महाराष्ट्रात आणत आहे. साखरेचे दरही कोसळलेले आहेत. राज्यात तूर खरेदी थांबली आहे. तरीही सरकारकडून पाकिस्तानातून साखर आणि मोझांबिकमधून तूर आयात केली जात आहे. दूध उत्पादक, ऊस उत्पादक, तूर उत्पादक अशा सर्वच शेतकऱ्यांचे शोषण सुरु आहे. मात्र, केंद्रात आणि राज्यात निर्लज्ज सरकार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांबद्दल चांगल्या निर्णयांची अपेक्षा नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत. याचा निषेध म्हणून येत्या ५ जूनला शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभर निषेध आंदोलन करणार आहोत.

 शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने गुजरात आणि कर्नाटकमधील राज्यात येत असलेले दूध, पाकिस्तानची आयात साखर आणि मोझांबिकची तूर तहसीलदार कार्यालयामार्फत फडणवीस सरकारला भेट म्हणून पाठवणार आहोत. त्यानंतरही सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास ७ जूननंतर शेतकऱ्यांनी शहरांचा भाजीपाला आणि दूध पुरवठा रोखावा असे आवाहन आहे. ७ जूननंतर शेतकऱ्यांनी हा लढा स्वतःच्या हातात घेऊन शहरांचा पुरवठा थांबवावा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यानंतर १० जूनला राज्यभरात शेतकरी चक्का जाम आंदोलन करुन सरकारला औकात दाखवून देतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच १ जूनपासून शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

re>

इतर ताज्या घडामोडी
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...