परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठक

परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठक
परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठक

परभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला रास्त भाव, उसाला एफआरपीनुसार दर आदी प्रश्नांवर आंदोलनाची दिशा ठिरविण्यासाठी आज (ता. १५) सकाळी ११ वाजता परभणी येथे शेतकरी सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस शेतकरी संघटनचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील आणि सुकाणू समितीतील सर्व संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.राज्यातील शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नांवर सरकारला अजिबात रस नाही. हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्ती देण्याचे आश्वासन सुकाणू समितीला देण्यात आले होते. परंतु सरकारला शेतकरी हा महत्त्वाचा घटक वाटत नाही. शेतकरी प्रश्नांवर आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली कदम यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com