agriculture news in marathi, farmers company trades through E-Nam | Agrowon

वसमत येथे शेतकरी उत्पादक कंपनीकडून ई-नाममध्ये ट्रेडिंग
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

हिंगोली : वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नामअंतर्गत ट्रेडिंग करणारी सातेफळ (ता. वसमत) येथील सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी ही पहिली शेतकरी कंपनी ठरली आहे. बुधवारी (ता. १६) या शेतकरी उत्पादक कंपनीने ५०० क्विंटल हळदीचे आॅनलाइन ट्रेडिंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हिंगोली : वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नामअंतर्गत ट्रेडिंग करणारी सातेफळ (ता. वसमत) येथील सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी ही पहिली शेतकरी कंपनी ठरली आहे. बुधवारी (ता. १६) या शेतकरी उत्पादक कंपनीने ५०० क्विंटल हळदीचे आॅनलाइन ट्रेडिंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेली सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी यापूर्वीच वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत सुरू करून शेतीमाल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये उतरलेली आहे. वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नामअंतर्गत व्यवहार सुरू झाल्यानंतर सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीने ई-नाम पोर्टलवर नोंदणी करून हळदीची ट्रेडिंग केली आहे. यामुळे कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांच्या क्लीनिंग ग्रेडिंग केलेल्या शेतीमालाची एकत्रिरीत्या ई-आॅक्शन पद्धतीने विक्री करता येत आहे. यामुळे चांगले दर मिळत आहेत.

वैयक्तिकरीत्या शेतकऱ्यांना लिलावासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. बुधवारी (ता. १६) सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीने ५०० क्विंटल हळद ई-नाम प्रणालीअंतर्गत विक्री केली, असे कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड यांनी सांगितले. वसमत बाजार समितीअंतर्गत ई-नामअंतर्गत व्यवहार सुरू झाले आहेत. आॅनलाइन वेइंग पद्धतीमुळे शेतीमालाच्या वजनाची नोंद संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर होत आहे. ई-नामबाबत शेतकरी, व्यापाऱ्यांमध्ये जागृती केल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे बाजार समितीचे सचिव एस. एन. शिंदे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...