agriculture news in Marathi, farmers company will establish pulses and soybean marketing center, Maharashtra | Agrowon

शेतकरी कंपन्या लातूरमध्ये उभारणार डाळी, सोयाबीन सुविधा केंद्र
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

लातूर : स्पर्धाक्षम बाजार घटक म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्वतंत्र पणन व्यवस्था उभी करण्यासाठी महाएफपीसी व लातूर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या पुढाकारातून लातूर येथे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर डाळी व सोयाबीन पणन सुविधा केंद्र उभारण्याबाबत कंपन्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. या बाबतची जिल्ह्यातील ९१ शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरीप हंगाम २०१९ च्या नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक लातूर येथे पार पडली. 

लातूर : स्पर्धाक्षम बाजार घटक म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्वतंत्र पणन व्यवस्था उभी करण्यासाठी महाएफपीसी व लातूर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या पुढाकारातून लातूर येथे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर डाळी व सोयाबीन पणन सुविधा केंद्र उभारण्याबाबत कंपन्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. या बाबतची जिल्ह्यातील ९१ शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरीप हंगाम २०१९ च्या नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक लातूर येथे पार पडली. 

लातूर बाजारपेठ डाळींच्या बाबतीत आशिया खंडामधील प्रमुख बाजार आणि सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. या बाजार केंद्रांचा थेट शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी मूल्यवर्धन साखळीत पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अत्याधुनिक साठवणूक व्यवस्था (सायलो), इलेक्ट्रॉनिक मार्केट यांचा समावेश असणार आहे.  सदर प्रकल्पात सहभागी होणाऱ्या शेतकरी कंपन्यांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या सुविधांच्या द्वारे शेतकरी कंपन्या एकत्रितपणे शेतमालाची साठवणूक करून स्थानिक प्रक्रियादार व स्टॅकिस्ट आणि त्याचप्रमाणे परराज्यातील बाजारपेठ यांना त्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करून पर्यायी व्यवस्था उभारून बाजारात संघटितपणे आपला प्रभाव निर्माण करतील. प्रकल्पासाठीचा स्वहिस्सा शेतकरी कंपन्या भागभांडवलामधून उभारणार आहेत. पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी राज्य शासनाची मदत घेतली जाणार आहे. राज्याचा पणन विभाग तसेच जागतिक बँक अर्थसहाय्यित ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या माध्यमातून सार्वजनिक गुंतवणूक आणण्यासाठी  प्रयत्न होणार आहेत.

उद्योग विभागाने शेतकरी कंपन्यांना एमआयडीसी मध्ये जमिनी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने सदर प्रकल्पासाठी लातूर एमआयडीसी येथे जागेची चाचपणी देखील सुरू केली आहे. या बैठकीसाठी महाएफपीसीचे अध्यक्ष योगेश थोरात, लातूर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीचे मोहन भिसे, बबन भोसले, लालासाहेब देशमुख, विलास उफाडे व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक उपस्थित होते.  

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...