धनादेश न वटल्याने व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा; साडेअकरा लाख अडकले

कोठरे येथील मदनसिंग मगर (वय ५५) या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची सुमारे साडेअकरा लाख रुपये किमतीची १५ टन डाळिंबे खरेदी करून या मालापोटी दिलेला धनादेश न वटवता त्यांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
pomegranate_2.jpg
pomegranate_2.jpg

मालेगाव, जि. नाशिक : तालुक्यातील कोठरे येथील मदनसिंग मगर (वय ५५) या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची सुमारे साडेअकरा लाख रुपये किमतीची १५ टन डाळिंबे खरेदी करून या मालापोटी दिलेला धनादेश न वटवता त्यांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात अजयसिंग ठाकूर (रा.ओडिशा, ह.मु. नाशिक व राहता) या परराज्यांतील व्यापाऱ्याविरुद्ध येथील वडनेर-खाकुर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  डाळिंब उत्पादक मगर यांच्या कोठरे शिवारातून ३० नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०१९ यादरम्यान ठाकूर या व्यापाऱ्याने विश्‍वास संपादन करून १५ टन डाळिंब वेळोवेळी खरेदी केला. या खरेदी केलेल्या डाळिंबाच्या व्यवहारापोटी ठाकूर याने श्री. मगर यांना तालुक्यातील मुंगसे येथील कोटक बँक शाखेचा ११ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश दिला.  मगर यांनी हा धनादेश वटविण्यासाठी वडनेर शाखेत जमा केला. त्या वेळी संशयिताच्या खात्यावर रक्कमच शिल्लक नसल्याने धनादेश वटला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशयिताने भूलथापा देऊन विश्‍वासघात करून डाळिंब खरेदी केले. तसेच रक्कम अदा न करता फसवणूक केल्याची तक्रार मगर यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून ठाकूर याच्याविरुद्ध वडनेर-खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com