राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
ताज्या घडामोडी
राहुरी कृषी विद्यापीठात उद्यापासून शेतकरी संमेलन
राहुरी विद्यापीठ, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठात शुक्रवारपासून (ता. २५ व २६) शेतकरी आधार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर कृषी प्रदर्शन, विविध पिकांचे प्रात्यक्षिक, पशुप्रदर्शन व कृषी विषयावर चर्चासत्र होणार आहे.

पीक प्रात्यक्षिकात तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, चारा आणि नगदी पिके, भाजीपाला पिके, फुलपिके, वनपिके आणि फळपिकांमधील विविध ५६ पिकांच्या १४५ वाणांची प्रात्यक्षिके १०० एकरांवर पाहता येणार आहेत. गाय, म्हैस, शेळी-मेंढी, कोंबड्यांच्या विविध जाती, तसेच कृषी अवजारे शेतकऱ्यांना पाहण्यास मिळणार आहेत. प्रदर्शनस्थळी कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांना एकाच दालनात पाहण्यास मिळणार आहेत.
याचबरोबर सिंचन प्रणाली, निचरा पद्धती, मातीपरीक्षण प्रात्यक्षिके, एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल, गांडूळ खतउत्पादन प्रकल्प, मधुमक्षिकापालन, जिवाणू खते, जैविक कीडनियंत्रण, एकात्मिक कीडव्यवस्थापन आदी कृषी तंत्रज्ञान पाहण्याची व जाणून घेण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी, उद्योजक, विद्यार्थ्यांसाठी हे संमेलन अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी दिली.
- 1 of 579
- ››