टोमॅटो हंगामावर संभ्रमाचे ढग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पसरलेल्या अफवा, मजूर व साहित्याच्या दरात झालेली दरवाढ तसेच परराज्यातील व्यापारी खरेदीसाठी येतील की नाही, असे विविध प्रश्न उपस्थित होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
tomato
tomato

नाशिक: जिल्ह्यात दरवर्षी पश्चिम पट्ट्यात खरीप हंगामात नागपंचमीच्यादरम्यान ११ हजार हेक्टरवर टोमॅटोच्या लागवडी केल्या जातात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पसरलेल्या अफवा, मजूर व साहित्याच्या दरात झालेली दरवाढ तसेच परराज्यातील व्यापारी खरेदीसाठी येतील की नाही, असे विविध प्रश्न उपस्थित होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.  जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी, सिन्नर, चांदवड, निफाड व इगतपुरी तालुक्यात सध्या लागवडीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यातच हवामान बदलामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. एकरी साधारण टोमॅटो लागवड ते काढणीदरम्यान १ लाखाच्यावर खर्च अपेक्षित असल्याचे शेतकरी सांगतात; मात्र या वर्षी खर्चाच्या २५ टक्के वाढ झाली आहे. त्यातच भांडवल उपलब्ध नसल्याने टोमॅटो उत्पादक कोंडीत सापडले आहेत.  जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत ही टोमॅटोची प्रमुख बाजारपेठ आहे. यासह गिरणारे (ता.नाशिक), पिंपळणारे फाटा (ता.दिंडोरी), ओझर (ता.निफाड) असे प्रमुख बाजार आहेत. मात्र करोनामुळे परराज्यातील व्यापारी खरेदीसाठी येतात की नाही याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.  अगोदरच येवला, निफाड, चांदवड तालुक्यातील अनेक भागात पूर्वहंगामी टोमॅटो लागवड अफवा व कोरोनामुळे घटली आहे. त्यातच नागपंचमीदरम्यान दुसऱ्या टप्प्यात होणारी टोमॅटो लागवड कमी होत असल्याची स्थिती आहे. त्यातच नाशिक परिसरात गिरणारे हे मजुरांचे केंद्र होते, मात्र वाहतूक बंद असल्याने मजूर उपलब्ध होण्यात अडचणी वाढल्या आहेत. टोमॅटो हंगामातील प्रमुख समस्या

  • वाहतूक बंद असल्याने मजूर उपलब्धतेत अडचणी
  • मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने स्थानिक मजुरांकडून दरवाढ 
  • कीटकनाशके व बुरशीनाशक यांच्याही दरात वाढ
  • उष्ण व दमट वातावरण असल्याने कीड - रोगांचा 
  • प्रादुर्भाव 
  • प्रतिकूल वातावरणामुळे फवारणी खर्चात वाढ
  • खर्चाची तुलनात्मक साधारण स्थिती

    बाब २०१९   २०२०    
    सुतळी (किलो) ६८  १००  
    तार (किलो)  ८०   १०५
    बांबू टोकर (नग)   २८  ३२  
    मजुरी  २५० ३५०

    प्रतिक्रिया कोरोनाचा प्रादुर्भाव असाच राहिला तरी मार्केट सुरळीत ठेवण्यासाठी शासकीय पातळीवरून मदत व्हावी. अन्यथा शेतकऱ्यांचे टोमॅटो हंगामातील अर्थकारण कोलमडेल.  -संतोष काश्मिरे, टोमॅटो उत्पादक, गिरणारे, ता.नाशिक

    खरेदीसाठी तयारी आहे. आम्ही प्रामुख्याने टोमॅटो निर्यात कामी खरेदीसाठी येतो. मात्र शासकीय पातळीवर अस्थिरता असल्याने आमच्या मनात भीती आहे. त्यामुळे सरकारने पुढाकार घ्यावा अन् आम्हाला आश्वस्त करावे.त्यानंतरच या संकटात काम करता येईल. - नसीम अहमद, टोमॅटो निर्यातदार, अमरोहा (उत्तर प्रदेश)

    निर्यातक्षम टोमॅटो वाणांच्या लागवडी कमी झाल्या. एकंदरीत टोमॅटो क्षेत्र सोयाबीनमध्ये गेले. सध्या वातावरण जीवाणुजन्य आणि बुरशीजन्य रोगासाठी अनुकूल आहे. त्यामुळे कॉपरयुक्त बुरशीनाशक आणि प्रतिजैविक यांच्या वापर करावा. शेतकऱ्यांनी वेळीच तज्ज्ञांचे मार्गदर्शन करून नियंत्रण करावे. - प्रा.तुषार उगले, किटकशास्त्र विभाग, के.के.वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com