agriculture news in Marathi farmers in confusion about loan Maharashtra | Agrowon

पीककर्ज परतफेडीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने परिपत्रक जारी करून शेतकऱ्यांना पिककर्ज भरण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याचे म्हटले आहे.

पुणे ः पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने परिपत्रक जारी करून शेतकऱ्यांना पिककर्ज भरण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याचे म्हटले आहे. परंतु या परिपत्रकात जे शेतकरी ३१ मार्चपर्यंत कर्ज भरतील. त्यांनाच सवलत लागू होईल, असे म्हटले आहे. तसेच जे शेतकरी जून अखेरीस कर्ज भरतील त्यांना संपूर्ण व्याज सवलत मिळणार किंवा कसे याबाबत काहीच स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा संभ्रम वाढला आहे.

सर्वत्र संचारबंदी असल्याने ३१ मार्च अखेरपर्यंत पिककर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. त्यातच कर्ज भरण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय रिझर्व बँकेने घेतला असल्याने शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला होता. परंतु रिझर्व बँकेचा निर्णय सहकारी बँकांना लागू नसल्याचे कारण देत पीडीसीसीने बँकेने ३१ मार्च पर्यंतच कर्ज भरावे लागेल असे म्हटल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला होता. पंरतु बॅंकेने निर्णय घेतल्याने त्यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. 

मात्र, या परिपत्रकात पीक कर्जाच्या व्याजाच्या सवलतीत स्पष्टपणे कुठलीही सूचना दिलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे, अशी माहिती जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी दिली.

शेतकऱ्यांमध्ये झालेले संभ्रमाविषयीची मुद्दे 

  • शेतकऱ्यांना व्याज माफी मिळणाबाबत स्पष्ट आश्वासन नाही.
  • नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना ५०,००० रुपयाचे अनुदान मिळणार की नाही याची खात्री नाही.
  • मार्चमध्ये ज्यांनी पीककर्ज भरले त्यांना लगेच पीककर्ज मिळणार का ? आणि मिळणार असेल तर त्यासाठी ७/१२ उतारे द्यावे लागतील का ?
  • सध्या सर्व सरकारी कार्यालये बंद असल्याने उतारे देऊ शकत नाही, मग कसे वाटप करणार
  • करोना या माहामारीपासून लोकांना वाचविण्यासाठी लोकांनीं गर्दी करू नये यासाठी जर हा निर्णय घेतला असेल तर शेतकऱ्यांना  ० टक्के व्याजदराचा नियमित कर्जफेड करणाऱ्यास ५०,०००/- चा लाभ मिळणे गरजेचे आहे.
  • ३१ मार्च नंतर व्याज भरावे लागेल, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा काय फायदा होईल?
     

इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...