शेतकऱ्यांना सहकार्य करणार ः पालकमंत्री कडू

शेतकऱ्यांना सहकार्य करणार ः पालकमंत्री कडू
शेतकऱ्यांना सहकार्य करणार ः पालकमंत्री कडू

अकोला  ः जिल्ह्यातील ४० शेतकऱ्यांची सावकारी कर्ज प्रकरणे विविध स्तरावर प्रलंबित आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी एकत्रित माहिती दिल्यास त्यांना न्याय देण्यासाठी विशेष सहकार्य करण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.  नियोजन भवनात आयोजित सावकारी कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा उपनिबंधक  डॉ. प्रवीण लोखंडे यांची विशेष उपस्थिती होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सावकारीची प्रकरणे उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक, सहकार आयुक्त (पुणे) तर काही प्रकरणे  उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. शेतक-यांनी आपले प्रकरणे कोणत्या सावकाराकडे व कोणत्या विभागाकडे आहे याची माहिती एकत्रितरीत्या दिली तर सावकारी कर्ज प्रकरणी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विशेष सहकार्य करण्यात येईल. आवश्‍यकता असल्यास शेतक-यांना उच्च न्यायालयामध्ये केस लढविण्यासाठी वकील सुद्धा देण्यात येईल. आवश्यक वाटल्यास  शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय देण्यासाठी सहकार विभागाकडून  परिपत्रक काढण्यासाठी  प्रयत्न करण्यात येईल असेही ते म्हणाले. या वेळी सोने तारण, पीककर्ज, पीकविमा व शेतकऱ्यांच्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com