नाशिक जिल्ह्यात लिलाव बंदमुळे शेतकरी संकटात

नाशिक : मागील वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस व मजूर टंचाईमुळे कांदा काढणी लांबणीवर गेली. त्यामुळे गुणवत्ता व प्रतवारीचा फटका उन्हाळ कांद्याला बसला आहे.
 Farmers in crisis due to auction closure in Nashik district
Farmers in crisis due to auction closure in Nashik district

नाशिक : मागील वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस व मजूर टंचाईमुळे कांदा काढणी लांबणीवर गेली. त्यामुळे गुणवत्ता व प्रतवारीचा फटका उन्हाळ कांद्याला बसला आहे. अगोदरच दरात घसरण झाल्यामुळे शेतकरी पिचला गेला. त्यातच कांदा लिलाव बंद झाल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. 

एकीकडे दरात सुधारणा झाल्याच्या वावड्या उठल्या. प्रत्यक्षात मात्र ग्राहकांची ओरड नव्हती. कांदा उत्पादन खर्चाच्या खाली विकला गेल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत पडतळ बसत नसल्याची स्थिती आहे. त्यातच बाजारात असलेली अस्थिरता शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे.

केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्यानंतर बाजार अस्थिर होते. त्यातच मागणी पुरवठ्यावर ताण पडल्याने दराने उसळी घेतली. मात्र ही सर्व घडामोड नैसर्गिक असताना शेतकऱ्याने साठवणूक मर्यादेचा निर्णय घेऊन पुन्हा एकदा अडचण निर्माण केली. या पार्श्वभूमीवर सलग ४ दिवस विक्री व्यवस्थाच कोलमडल्याने मोठे संकट ओढवले आहे.

कोंडी कधी सुटणार

दिवसेंदिवस कांदा खराब होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची चाळणी करून खराब कांदा बाहेर काढला. मात्र सड वाढत आहे. हंगामासाठी भांडवलाची चिंता भेडसावत असल्याने ही कोंडी फुटणार कधी, असा संतप्त सवाल शेतकरी व शेतकरी संघटना करू लागल्या  आहेत. 

अगोदरच निम्मा कांदा सडला. आता कांदा विक्री शेवटच्या टप्प्यात असताना बदलत्या वातावरणामुळे उरलेल्या कांद्याची सड पुन्हा वाढली आहे. त्यामुळे जे काही पदरी पडणार होते, ते तर नाही, मात्र बाजार बंद राहिल्याने अडचण आणखीच वाढली आहे.  - पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता. कळवण

कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. केंद्र सरकारने चुकीचा निर्णय घेतला, हे मान्य आहे. पण, आता एवढे दिवस मार्केट बंद ठेवण्यात व्यापाऱ्यांचा ही आडमुठेपणा दिसतोय. स्वतःच्या गोडावूनमधील कांदा विकताय. मग शेतकऱ्यांचीच खरेदी बंद का? जास्त नफा कमविण्याचे व्यापाऱ्यांचे षडयंत्र दिसते आहे. लिलाव चालू करावे. अन्यथा, व्यापाऱ्यांच्या गोडावूनमधील कांदा स्वाभिमानी जिल्ह्याबाहेर पडू देणार नाही. - संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com