ऑक्‍सिजन वाढीसाठी शेतकऱ्यांची पिके महत्त्वाची

ऑक्‍सिजन वाढीसाठी शेतकऱ्यांची पिके महत्त्वाची
ऑक्‍सिजन वाढीसाठी शेतकऱ्यांची पिके महत्त्वाची

कोल्हापूर : कार्बन क्रेडिटचे योगदान शेतकऱ्याला सर्वाधिक मिळू शकते. परंतु, या बाबत अद्याप फारशी जागृती झाली नाही. वातावरणातील ऑक्‍सिजन वाढीसाठी शेतकऱ्यांची पिके महत्त्वाची ठरतात. त्यांना याचा लाभ झाला पाहिजे, असा सूर गुरुवारी (ता. २) येथे झालेल्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरण शास्त्र विभाग, आणि शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ‘कार्बन क्रेडिटस आणि जलव्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा झाली.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, विकसित देशातील अनेक उद्योगधंद्यामुळे प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर झाला. या देशांनी पर्यावरणीय समतोल राखण्याकरिता कार्बन क्रेडिटची संकल्पना आणली. तुम्ही पर्यावरणाचा समतोल राखा आम्ही तुम्हाला पैसे देतो, असे सांगत अनेकांपर्यंत ही कल्पना पोचविली. परंतु, त्याचा लाभ शेतकऱ्यांना फारसा होत नाही, असे चित्र आहे.

विकसनशील देशात ही कल्पना चांगली असली तरी कार्बन क्रेडिट मिळविण्याचा अधिकार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनाच जातो. यादृष्टीने सार्वत्रिक विचारमंथन होणे गरजेचे आहे. विद्यापीठ व शेतकरी यांच्यात नाते जोडण्यासाठी, तसेच विद्यापीठाच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी आम्ही येथून पुढेही असे कार्यक्रम राबवत आहोत.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, शेतकरी उदरनिर्वाहासाठी पिके घेतो. ही पिके कार्बनडाय ऑक्‍साईड शोषून घेऊन ऑक्‍सिजन सोडतात. शेतकऱ्यांसाठी ही नियमित प्रक्रिया असली तरी त्याला याचा लाभ मिळू शकतो हे माहीत नाही. याची चर्चा व्हावी कार्बन क्रेडिटची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, या उद्देशाने आम्ही व शिवाजी विद्यापीठाने मिळून याची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com