Agriculture news in marathi farmers dairy business success story from aasoda district jalgaon | Agrowon

दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधार

चंद्रकांत जाधव
रविवार, 12 जुलै 2020

पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण वांद्रे यांनी व्यवसाय सांभाळून शेतीच्या आवडीतून आसोदा (ता.जि.जळगाव) येथे शेतीला सुरुवात केली. पशुपालनाला चालना दिली. यातून दहा जणांना बारमाही रोजगार मिळाला आहे.
 

पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण वांद्रे यांनी व्यवसाय सांभाळून शेतीच्या आवडीतून आसोदा (ता.जि.जळगाव) येथे शेतीला सुरुवात केली. हंगामी पिकांच्या बरोबरीने डाळिंबाची बाग केली, परंतु अपेक्षित फायदा मिळाला नाही. परंतु हताश न होता पशुपालनाला चालना दिली. यातून दहा जणांना बारमाही रोजगार मिळाला आहे.

अनिल वांद्रे हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील. नांदेड येथील महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीची (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी घेतल्यानंतर व्यवसायाच्या निमित्ताने ते पनवेल येथे स्थायिक झाले. या ठिकाणी बांधकामांचे आराखडे (डिझाईन), आर्किटेक्चर यासंबंधी काम सुरू केले. या कामात कौशल्य अवगत असल्याने यशही मिळत गेले. पुढे बांधकाम व्यवसायातही त्यांनी जम बसविला. या दरम्यानच्या काळात त्यांना शेतीची आवड निर्माण झाली होती.

शेतीसाठी आईचा आग्रह
अनिल वांद्रे यांच्या आईने जळगाव जिल्ह्यात आपल्या कुटुंबांची शेती असावी अशी इच्छा व्यक्त केली होती. आईचा आग्रह लक्षात घेऊन अनिल वांद्रे यांनी आसोदा (ता.जळगाव) येथे २००८ साली ओळखीतून टप्याटप्याने पंधरा एकर शेत जमीन खरेदी केली. पहिले एक वर्ष हंगामी पिकांच्या लागवडीचा अंदाज आल्यानंतर पुन्हा परिसरात आणखी १२ एकर शेत जमीन खरेदी केली. सध्या त्यांच्याकडे २७ एकर शेती आहे. शेतीच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी मजूर ठेवले आहेत. जमीन काळी कसदार असल्याने त्यांनी कापूस, हरभरा आदी पिकांच्या लागवडीला सुरुवात केली. दर महिन्याला दोन वेळा गावी जात शेतीची आखणी त्यांनी सुरू केली. वांद्रे यांना चार बंधू आहेत. तीन जण अभियंता आहेत. सर्वांत थोरले बंधू जळगाव महापालिकेत अधिकारी आहे. अनिल यांची कन्या मानसी ही देखील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

डाळिंबाची फळबाग
पहिल्या टप्यात हंगामी पिकांच्या बरोबरीने अनिल वांद्रे यांनी फळबाग लागवडीचे नियोजन केले. शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी चार कूपनलिका खोदल्या. २००९ नंतर वांद्रे यांनी टप्याटप्याने डाळिंबाची लागवड केली. दोन वर्षांमध्ये त्यांनी २४ एकर क्षेत्र डाळिंब लागवडीखाली आणले. बागेच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी सल्लागार आणि कायमस्वरूपी मजुरांची नेमणूक केली. परंतु बाजारपेठेतील दर आणि खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्याने त्यांनी २०१७ मध्ये डाळिंबाची बाग काढून टाकली. या बागेमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक झाली होती. मात्र अपेक्षित नफा मिळत नव्हता. पण निराश न होता पुन्हा नव्या जोमाने परिसरातील बाजारपेठेचा अंदाज घेत शेतीला नवी दिशा देण्यास सुरुवात केली.

पशुपालनाकडे वाढला कल

  • अनिल वांद्रे यांनी २००८ मध्ये जमीन खरेदी करतानाच दोन देशी गाईंचा सांभाळ केला होता. शेतीच्या जोडीला पशूपालनातूनही नफा मिळेल तसेच इतरांनाही रोजगार मिळू शकतो, याचा अंदाज घेऊन त्यांनी २०१७ मध्ये पशुपालनाला सुरुवात केली.
  • दूध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी वांद्रे यांनी जळगाव येथील डेअरी उद्योजक अनंत खडसे यांचे मार्गदर्शन घेतले. दुग्ध व्यवसायातील यशापयशाचे मुद्दे पशू तज्ज्ञांच्याकडून समजावून घेतले. त्यानुसार पशुपालन आणि दूध विक्रीचे नियोजन केले. पहिल्या टप्यात १२ एचएफ गाईंची खरेदी केली. जनावरांच्या व्यवस्थापनासाठी सहा कायम स्वरूपी मजूर गोठ्यावर ठेवले,त्यांच्या रहाण्याचीही व्यवस्था केली.
  • गाई, म्हशींच्या व्यवस्थापनाबाबत वांद्रे म्हणाले की, मी पहिल्यांदा चांगला गोठा तसेच कोरडा चारा साठवणुकीसाठी योग्य व्यवस्था तयार केली. टप्याटप्याने दूध विक्रीच्या अंदाजानुसार जनावरांच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली. सध्या माझ्याकडे ४५ म्हशी आणि २० गाई आहे. सध्या दररोज ३५० लिटर दुधाचे संकलन होते. गोठ्यामध्ये एचएफ गाई तसेच बन्नी, मेहसाणा आणि जाफराबादी म्हशी आहेत. गाई, म्हशींचे योग्य व्यवस्थापन ठेवले जाते. गरजेनुसार योग्यवेळी वैद्यकीय उपचार केले जातात. जनावरांच्या व्यवस्थापनासाठी डॉ.अविनाश इंगळे, डॉ.खाचणे,डॉ.शिंदे,डॉ.तायडे यांचे चांगले मार्गदर्शन मिळते. म्हशीच्या दुधाला मागील दोन वर्षे सरासरी ५० रुपये आणि गाईच्या दुधाला ३० ते ३५ रुपये प्रति लिटर दर मिळाला आहे. परंतु लॉकडाऊनमध्ये गाई, म्हशीच्या दुधाचे दर कमी झाले. परंतु आता दरात सुधारणा होईल असे वाटते. गाई, म्हशींच्या व्यवस्थापनासाठी सहा कायमस्वरूपी आणि चार मजूर रोजंदारीवर आहेत.
  • गेल्या तीन वर्षांपासून अनिल वांद्रे यांच्या सासू प्रतिभा काकडे या शेतीवर राहून संपूर्ण पशुपालनाची जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे दैनंदिन नियोजन लक्ष राहते. आर्थिक व्यवस्थापनाला शिस्त आली आहे. गेल्या वर्षीपर्यंत वांद्रे यांनी गोठ्यात तयार झालेल्या कालवडी विकल्या. परंतू आता दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी कालवडींची विक्री बंद केली आहे. पशुपालनाचा खर्च मर्यादित ठेवून नफ्यात वाढ राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

डेअरीचा प्रयोग
गाई, म्हशींच्या दुग्धोत्पादनाचा अंदाज घेत वांद्रे यांनी मूल्यवर्धनाकडे लक्ष दिले. २०१९ साली त्यांनी आसोदा गावी डेअरी सुरू केली. याठिकाणी ग्राहकांच्या मागणीनुसार दूध, दही, ताकाची विक्री सुरू केली. मात्र एक वर्षांनी डेअरीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी योग्य मनुष्यबळ, वेळ आणि इतर अडचणींमुळे त्यांना डेअरी बंद करावी लागली. त्यामुळे मागील काही वर्षांपासून वांद्रे हे उत्पादित होणारे सर्व दूध जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला देतात.

शेणखताला मागणी
अनिल वांद्रे यांच्याकडे गाई,म्हशींची मोठी संख्या असल्याने दरवर्षी ६० ट्रक शेणखत उपलब्ध होते. स्वतःच्या शेतीमध्ये वापरून उरलेल्या शेणखताची जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्री केली जाते. यातून दरवर्षी दोन लाखांचे उत्पन्न मिळते.

तुपाची नोंदणीनुसार विक्री
अनिल वांद्रे यांनी दुधाच्या बरोबरीने तूप विक्रीचे देखील नियोजन केले आहे. शेतावरील घरामध्ये तूप निर्मिती केली जाते. दरवर्षी किमान ५० किलो दर्जेदार तुपाची निर्मिती होते. याची विक्री वांद्रे हे पनवेल शहरातील मित्रमंडळींना करतात. जशी मागणी येते, तशी निर्मिती करून तुपाचा पुरवठा केला जातो. सध्या ९०० रुपये प्रति किलो दराने तुपाची विक्री केली जाते.

पुरेसा चारा, शेततळ्याची व्यवस्था
अनिल वांद्रे यांनी संपूर्ण २७ एकरात संकरित नेपिअर गवताची लागवड केली आहे. त्यामुळे वर्षभर गाई,म्हशींना हिरवा चारा उपलब्ध असतो. त्यामुळे पशुपालनातील मोठा खर्च त्यांनी वाचविला आहे. फक्त यंदाच्यावर्षी त्यांनी दोन लाखाचा कोरडा चारा कुट्टी करून शेडमध्ये भरून घेतला आहे. गाई,म्हशींना दररोज कुट्टी केलेला चारा आणि तज्ज्ञांच्या सल्याने खाद्य मिश्रण दिले जाते. त्यामुळे दुग्धोत्पादनात सातत्य आहे. गाई,म्हशींचे आरोग्यही राखले जाते. पावसाच्या पाण्याचा योग्य साठा होण्यासाठी आणि चारा पिकांना शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी दोन शेततळी देखील तयार केली आहेत.

व्यवसायाची सूत्रे

  • जातिवंत दुधाळ गाई, म्हशींचे संगोपन.
  • खाद्य, आरोग्य खर्चावर नियंत्रण ठेवून नफा वाढीचा प्रयत्न.
  • पुरेशी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता.
  • जातिवंत दुधाळ कालवडींच्या निर्मितीवर भर.
  • प्रक्रिया, पूरक उद्योगावर लक्ष.
  • शेतीबांधावर दोन हजार शेवग्याची लागवड.

संपर्क- अनिल वांद्रे, ९३२२३३२४७९


फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
जनावरांच्या खुराकात मिसळा ॲझोलाजनावरांच्या आहारात संकरित नेपिअर, सुबाभूळ, चवळी,...
व्यवस्थापन गाभण शेळ्यांचेशेळीपालनाचे उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या...
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
जनावरातील सर्पदंशाचे निदान अन्‌ उपचार सध्याच्या काळात चराईला जाणाऱ्या जनावरांच्यामध्ये...
गाभण शेळी तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानशेळी गाभण झाल्यानंतर शरीरात विविध बदल होतात....
मधमाशीपालनातून मिळवा प्रोपोलिस, रॉयल...प्रोपोलिस मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत....
मधमाशी पालनामध्ये मोठी व्यावसायिक संधीमधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध...
पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापनपावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो....
`मनरेगा‘च्या माध्यमातून पशुसंवर्धन योजनाग्रामीण भागात राहणाऱ्या अकुशल कामगारांना गावातच...
स्वच्छ दूध निर्मितीसाठी उपाययोजनागोठा नेहमी स्वच्छ, कोरडे, खाच खळगेविरहित असावा....
प्रयोगशाळांतून होईल पशू आजाराचे योग्य...जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे, जनावरातील आजारांचे...
स्वच्छ दूधनिर्मितीवर लक्ष द्यादुधाची प्रत ही दुधातील फॅट, एस.एन.एफ.चे प्रमाण...
नवजात वासराची घ्यावयाची काळजीआरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे  पहिले...
गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनकोळंबी संवर्धनासाठी तलावाचे क्षेत्रफळ ०.१ ते ०.२...
जनावरांतील सर्पदंशांवर प्राथमिक उपचारसर्पदंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही....
जनावरांच्या आजाराकडे नको दुर्लक्षपशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची...
शेळ्यांना द्या सकस आहार...शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी...
बायोफ्लाक मत्स्यपालनाचे तंत्रबायोफ्लाक तंत्रज्ञानातील महत्त्वाचे घटक म्हणजे...
व्यवस्थापन गाई-म्हशींचेसाधारणपणे गाई,म्हशींचा गाभण काळ अनुक्रमे २८० ते...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...