agriculture news in marathi farmers daughter becomes Police sub inspector | Agrowon

आईचे छत्र हरवलेली शेतकरी कन्या जिद्दीने झाली 'पीएसआय'

सुनील पांढरे
सोमवार, 23 मार्च 2020

दीडगाव येथील पूजा किसन पांढरे ही शेतकरी कुटुंबातील. पूजाच्या आईचे तीन वर्षांपूर्वी अल्पशा निधन झाले, तरी तिने वडील, भाऊ, काका, काकू आदी मंडऴींच्या मदतीने दिवसरात्र अभ्यास केला. पोलिस खात्यातील पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण करीत अभिनंदनास पात्र ठरली.

अंधारी, ता. सिल्लोड : कुठल्याही क्षेत्रात नावलौकिक करायला, यश संपादन करायला परिस्थिती आड येता काम नये हे ब्रीद अनेकांकडून आपण ऐकत आलो. परंतु ते सत्यात उतरावयला जी मेहनत लागते तिच्या मागचा त्याग खूप मोठा असतो. अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी आईचे छत्र हरवलेल्या शेतकरी कन्या असलेल्या पूजाने मेहनत, चिकाटीच्या जोरावर भरारी मारत पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. 

दीडगाव येथील पूजा किसन पांढरे ही शेतकरी कुटुंबातील.पूजाच्या आईचे तीन वर्षांपूर्वी अल्पशा निधन झाले, तरी तिने वडील, भाऊ, काका, काकू आदी मंडऴींच्या मदतीने दिवसरात्र अभ्यास केला. पोलिस खात्यातील पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण करीत अभिनंदनास पात्र ठरली. पूजाचे शिक्षण १ ली ते ७ वी दीडगाव जिल्हा परिषद, तर ८ वी ते १२ वी पर्यंत भराडी येथील सरस्वती भुवन येथे, पदवीचे शिक्षण सिल्लोड येथील यशवंत महाविद्यालयात झाले. स्पर्धा परीक्षेची तयारी करिता तिला दादाराव गोराडे यांचे मार्गदर्शन लाभले. 

तिचे वडील किसन हे शेतकरी आहेत अल्प शेती, त्यात निसर्गाची साथ नाही, शेती पिकली तरी भाव नाही अशा आर्थिक खडतर स्थितीतही वडील व मामांनी शिक्षणाची उमेद तिच्यात निर्माणच केली नाही, तर सगळे बळ एकवटून तिच्या पाठीशी उभे राहिले. तीन वर्षांपूर्वी तिच्या आईचे छत्र हरवले, घरची जबाबदारी व अभ्यास अशी कसरत करत जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी करून हे घवघवीत यश संपादन केले. आईच्या चरणी हे यश समर्पित करताना, आज ती हे यश पाहायला असायला हवी होती हे सांगताना तिचा कंठ दाटून आला होता. आपल्या यशाचे श्रेय आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांनाच तिने दिले आहे.

पूजाच्या या यशाबद्दल किसन पांढरे, दादाराव पांढरे, पंढरी पांढरे, संगीता पांढरे यासह नातेवाईक, शिक्षक वृंद, मित्रपरिवाराकडून समाधान व्यक्त केले गेले.


इतर ताज्या घडामोडी
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...