कृषिकन्या उपोषणावर ठाम

कृषी कन्या उपोषण
कृषी कन्या उपोषण

पुणतांबा, जि. नगर ः शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी पुणतांबा (जि. नगर) येथे शेतकऱ्यांच्या मुलींनी सुरू केलेले अन्नत्याग अंदोलन शुक्रवारी (ता. ८) पाचव्या दिवशीही सुरूच होते. सकाळी पालकमंत्री राम शिंदे यांनी अंदोलनकर्त्या मुलींसह गावकऱ्यांशी चर्चा केली, मात्र मागण्या मान्य होईपर्यंत अंदोलन मागे घ्यायचे नाही, यावर अंदोलनकर्त्या तरुणी ठाम राहिल्या. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत गावकरी परिसरातील शेतकऱ्यांनी पुणतांब्यात रास्ता रोको अंदोलन केले. दरम्यान प्रकृती बिघडलेल्या शुभांगी जाधव या तरुणीला गावकरी आणि उपोषणकर्त्यांचा विरोध मोडून प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शेतकरी संपावेळी शासनाने दिलेल्या अश्‍वासनाची पूर्तता करावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी पुणतांबे (जि. नगर) येथे सोमवार (ता. ४) पासून निकिता धनंजय जाधव, पूनम राजेंद्र जाधव आणि शुभांगी संजय जाधव या महाविद्यालयीन शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग अंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी अंदोलनाचा पाचवा दिवस होता. गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अंदोलनकर्त्या मुलींची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली, मात्र ती अमान्य केली त्यानंतर शुक्रवारी सकाळी पालकमंत्री राम शिंदे यांनीही पुणतांबा येथे अंदोलनकर्त्या मुलींची भेट घेऊन मुलींशी व गाककऱ्यांशी चर्चा केली, मात्र ‘‘काहीही झाले तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही.''अशी भूमिका उपोषणकर्त्या मुलींसह गावकऱ्यांनी घेतल्याने शिंदे यांचा नाईलाज झाला.  शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांनी शासनाच्या भूमिकेचा निषेध करत रास्ता रोको अंदोलन केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com